मुंबईत हाय अलर्ट! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, तस्करीची भीती वाढली

Mumbai police alert over missing minor girls: मुंबईत अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. बाल तस्करीची भीती व्यक्त केली जात असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी करत विशेष शोध मोहीम सुरू केली आहे.
social Media
Fact Check Saam tv
Published On

Missing children cases in Mumbai : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण मागील ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. बेपत्ता झालेल्यांमध्ये ८ मुलींचा समावेश आहे. मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मुलं बेपत्ता झालीय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी 'हाय अलर्ट' जारी केलाय. एकाच वेळी इतकी मुले बेपत्ता झाल्यामुळे मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे...पोलिसांकडून बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होणे, ही गंभीर आणि चिंताजनक आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १३७(२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता होण्याच्या या प्रकारामुळे मुंबईत कार्यरत असलेल्या संघटित बाल तस्करी टोळीबद्दल चिंता आणखी बळावली आहे. पोलिसांनी मुलांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथके नेमली आहेत.

शिवाजी नगर (४), साकीनाका (२), अँटॉप हिल (२ ) आणि ओशिवरा, मानखुर्द, बांगूर नगर आणि घाटकोपर या ठिकाणाहून प्रत्येकी एक मुले बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत आहे. आतापर्यंत कोणत्याही कुटुंबाला खंडणीचे कॉल आलेले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. मुलांच्या शोध घेण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. गजबजलेल्या बाजारपेठा, सार्वजनिक बागा, रेल्वे स्थानके, बस डेपो, रुग्णालये, बालगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित केले आहेत.

social Media
Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढले आहे. जून ते डिसेंबर या काळात १४५ मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी ९३ मुली होत्या. १ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान एकूण ८२ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये निम्म्याहून अधिक मुलींचा समावेश होता. १८ वर्षांखालील ४१ मुली आणि १३ मुलांचा समावेश होता.

social Media
Pune : पुणे पोलीस दलात हळहळ, बड्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, मध्यरात्री काळाचा घाला

२०२५ मध्ये कोणत्या महिन्यात किती बेपत्ता ?

जून: २६ मुली

जुलै: २५ मुले (१५ मुले, १० मुली)

ऑगस्ट: १९ मुले (पाच मुले, १४ मुली)

सप्टेंबर: २१ मुले (सहा मुले, १५ मुली)

ऑक्टोबर: १९ मुले (१२ मुले, सात मुली)

नोव्हेंबर: २४ मुले (नऊ मुले, १५ मुली)

डिसेंबर: ११ मुले (पाच मुले, सहा मुली)

social Media
Praful Patel : प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती, भाजपच्या पियुष गोयल यांची घोषणा, राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com