राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितिच्या निवडणुकीचे रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 7 तारखेला मतदान होणार असून 9 तारखेला निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर तिकीट मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. अशातच कोकणात पक्षातील नेत्याच्याच विरोधात उमेदवारी अर्ज भरल्याने शिंदे गटाने थेट हकालपट्टी केली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातखंबा गटात शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या परशुराम कदम यांची शिंदे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. परशुराम कदम हे शिंदे शिवसेनेचे युवा सेना कोकण विस्तारक म्हणून कार्यरत होते. जिल्हा परिषद हातखंबा गटातून उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षाकडून देण्यात आले होते. मात्र अंतिम उमेदवार यादीत नाव न आल्याने नाराज झालेल्या परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड केल्याने शिस्तभंगाची कारवाई करत जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र शिंदे शिवसेनेकडून जारी करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, परशुराम कदम यांनी 30 ऑक्टोबर 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. पक्षप्रवेशावेळी हातखंबा गटातून उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने आता शिंदे शिवसेनेने कठोर भूमिका घेत थेट हकालपट्टीची कारवाई केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.