BJP leaders announce historic mayoral decision in Amravati Municipal Corporation
BJP leaders announce historic mayoral decision in Amravati Municipal CorporationSaam Tv

भाजपची मास्टरस्ट्रोक खेळी! राज्यातील 'या' महापालिकेत पहिला सिंधी महापौर

BJP First Sindhi Mayor In Maharashtra History: अमरावती महानगरपालिकेत भाजपने मोठी राजकीय खेळी करत महाराष्ट्रातील पहिल्या सिंधी महापौराची घोषणा केली आहे. महापौरपदावरून राज्यात राजकीय चर्चा रंगली आहे.
Published on

महापालिका निवडणुकीमध्ये 29 पैकी 27 ठिकाणी भाजपने सत्ता काबीज केली आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपल्याचे पाहायला मिळाले. राज्यात जरी एकत्र असले तरी महापालिका निवडणुकीत एकमेकांवर या तीनही पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. काही ठिकाणी एकत्र लढले तर काही ठिकाणी विरोधात यामुळे मोठा मतदारांमध्येच संभ्रम निर्माण झाला होता. निकाल लागल्यानंतर देखील महापौरपदावरून रस्सीखेच सुरू आहे. अनेक ठिकाणी अद्यापही हा तिढा सुटत नाहीये.

BJP leaders announce historic mayoral decision in Amravati Municipal Corporation
एकीकडे अश्रूंचा महापूर, दुसरीकडे धक्कादायक कृत्य; बारामतीत अजितदादांच्या अंत्यविधीवेळी संतापजनक प्रकार

तर मुंबई महापौरपदावरून मोठे राजकारण पेटले होते. मराठी, हिंदू, मुस्लिम की उत्तरभारतीय बसणार यावरून खडाजंगी पाहायला मिळाली. अजूनही मुंबई महापालिकेचा महापौर निश्चित झालेला नाहीये. दरम्यान अमरावतीमध्ये भाजपने मोठी खेळी खेळली आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजितदादा गट, रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी, आणि शिवसेना शिंदे गट अशाप्रकारे सत्ता स्थापन होणार आहे. तर आज भाजपच्या अंतर्गत बैठकीमध्ये सुरुवातीचे अडीच वर्ष भाजप घेणार आहे.

BJP leaders announce historic mayoral decision in Amravati Municipal Corporation
राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घाला, इंदुरीकर महाराजांनी का केली मागणी ?

सुरुवातीचे सव्वा वर्षात भारतीय जनता पार्टीचे श्रीचंद तेजवानी आणी दुसऱ्या सव्वा वर्षात भाजपचे आशिष अतकरे हे महापौर होणार आहेत. महाराष्ट्रात भाजपने सिंधी समाजाचा पहिला महापौर श्रीचंद तेजवाणी यांना संधी दिली आहे.

6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी आज भारतीय जनता पक्षाने अधिकृतरित्या महापौर पदाचे उमेदवार जाहीर केले आहेत. दुसऱ्या अडीच वर्षात युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला महापौर पद देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com