Mumbai-Pune High Speed Corridor: अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा! मुंबई, पुण्याला मिळणार रेल्वे कॉरिडॉर, नेमका काय होणार फायदा?

Mumbai-Pune High Speed Corridor Annoucement in Budget 2026: मुंबई-पुणे प्रवास खूप वेगवान होणार आहे. आता मुंबई पुणे, हैदराबाद या ठिकाणी हायस्पीड कोरिडॉर उभारण्यात येणार आहे.
Mumbai-Pune High Speed Corridor
Mumbai-Pune High Speed CorridorSaam Tv
Published On
Summary

मुंबई पुणे प्रवास वेगवान होणार

हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा

एकूण ७ हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणार

मुंबई आणि पुण्याचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. मुंबई-पुणे या दोन शहरांमद्ये नवी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या कोरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे या दोन शहरातील ट्रेन वेळेवर धावणार आहेत.

Mumbai-Pune High Speed Corridor
Budget 2026: नवरा-बायकोला एकत्र फाइल करता येणार इन्कम टॅक्स, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडोर उभारणार (Mumbai Pune High Speed Corridor)

अर्थसंकल्पीय भाषणावेळी निर्मला सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या. त्यामध्ये देशात ७ नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर होतील, असे सांगितले. त्यामध्ये मुंबई-पुणे, पुणे हैद्राबाद या दोन कॉरिडॉरचा समावेश आहे. कॉरिडॉर तयार झाल्यानंतर मुंबई-पुणे या दोन शहरातील प्रवास अधिक वेगात होणार आहे. महाराष्ट्रातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन कॉरिडोर पुण्याला मिळणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रवास सुसाट होणार आहे. याचसोबत इतर राज्यांनादेखील जोडले जाणार आहे.

Mumbai-Pune High Speed Corridor
Budget : काय स्वस्त आणि काय महाग? स्मार्टफोनपासून ते होमलोन, या १० गोष्टींकडे लक्ष

कोण कोणते ७ हायस्पीड रेल्वे कोरिडॉरची घोषणा? (7 New High Speed Train Corridor)

मुंबई पुणे हायस्पीड

पुणे हैदराबाद

हैदराबाद-बंगळुरु

हैदराबाद-चेन्नई

चेन्नई-बंगळुरु

दिल्ली-वाराणसी

वाराणसी सिल्लीगुरी

२० नवीन जलमार्ग बांधणार

पुढील ५ वर्षात देशात २० नवीन जलमार्ग बांधण्यात येणार आहे. यामध्ये जहाजबांधणीसाठी नवीन जलमार्ग बांधले जाणार आहेत. वाराणसी, पाटण्यात जहाजबांधणी केंद्र उभारणार आहे. ओडिशात नवे २२ जलमार्ग सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.

Mumbai-Pune High Speed Corridor
Mumbai Railway : मुंबई रेल्वेचा मोठा निर्णय! प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 'तिसरा डोळा'; नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com