शक्तिपीठ महामार्गावरून राजकारण तापलं; समर्थक-विरोधक आमने-सामने; कोल्हापूरात मोठा गोंधळ

Shaktipeeth Highway Controversy In Kolhapur: कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गावरून राजकीय वाद चिघळला असून समर्थक आणि विरोधक आमदारांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
MLAs Satej Patil and Rajesh Kshirsagar engage in a political clash over the Shaktipeeth Highway project in Kolhapur.
MLAs Satej Patil and Rajesh Kshirsagar engage in a political clash over the Shaktipeeth Highway project in Kolhapur.saam tv
Published On

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या महामार्गाच्या समर्थनासाठी आणि विरोधासाठी आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. या महामार्गाला विरोध करण्यासाठी उद्या कोल्हापूरमध्ये एका भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला असून हा प्रकल्प शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवर जबरदस्तीने लादला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

MLAs Satej Patil and Rajesh Kshirsagar engage in a political clash over the Shaktipeeth Highway project in Kolhapur.
Chhagan Bhujbal: राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव फायनल, पण अटीमुळं निर्माण झाली अडचण?

या शक्तिपीठ महामार्गाची महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला खरोखर गरज आहे का? गरज नसलेल्या या महामार्गावर हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा तोच निधी ग्रामीण भागातील रस्ते, आपले ऐतिहासिक गड किल्ले आणि मंदिरांच्या विकासासाठी वापरावा. सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून हा प्रकल्प जनतेवर लादत आहे, त्याला आमचा तीव्र विरोध राहील असे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले.

MLAs Satej Patil and Rajesh Kshirsagar engage in a political clash over the Shaktipeeth Highway project in Kolhapur.
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन अन् शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं; महायुतीच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

दुसरीकडे, महायुतीचे नेते आणि शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत महामार्गाचे जोरदार समर्थन केले आहे. मोठे महामार्ग हेच राज्याच्या आणि देशाच्या विकासाचे खरे माध्यम असतात, असे सांगत त्यांनी सतेज पाटलांवर पलटवार केला.

MLAs Satej Patil and Rajesh Kshirsagar engage in a political clash over the Shaktipeeth Highway project in Kolhapur.
Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे विकासाला मोठी गती मिळणार आहे. विरोधक केवळ राजकारणासाठी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्यांनी कितीही आंदोलनं किंवा मोर्चे काढले, तरी शक्तिपीठ महामार्ग होणारच असा ठाम निर्धार आमंदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com