Auto LPG Price Reduced in Nagpur : नागपुरात ऑटो एलपीजीच्या दरात प्रति किलो 5 रुपयांची मोठी घट झालीय. आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG पुरवठा खंडित झाला होता. ज्यामुळे गॅसचे दर थेट 120 रुपयांच्या पार गेले होते. मात्र, आता पुरवठा सुरळीत झाल्याने हे दर 95 रुपयांवर आले आहेत. या कपातीमुळे वाढत्या इंधन खर्चाने त्रस्त ऑटोचालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळालाय.
आखाती देशातील तणावामुळे देशात इंधनाचा तुटवडा झालाय. त्यामुळे पेट्रोल-डिझेलपासून ते गॅस सिलिंडर अन् ऑटो एलपीजीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पेट्रोल मागील महिन्यात सात रूपयांनी वाढले होते. तर रविवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २९ रूपयांची वाढ झाली होती. आता ऑटो एलपीजी स्वस्त झालाय, हा सर्वसामान्यांना दिलासा म्हटले जातेय.