जुन्या मुंबई–पुणे महामार्ग वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

old mumbai-pune highway news today : जुन्या मुंबई–पुणे महामार्ग वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.
जुन्या मुंबई–पुणे महामार्ग वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Published On
Summary

मुंबई–पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी मोठी बातमी

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक

रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई–पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा अखेरचा शनिवार-रविवार आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक-पर्यटकांमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे जुना मुंबई–पुणे महामार्ग वाहतूक कोंडीने अक्षरशः ठप्प झाला आहे. कार्लाच्या एकवीरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर आणि महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबई, पुण्यासहित राज्यभरात हजारो भाविक आणि पर्यटक एकवीरा देवीच्या दर्शनासाठी पोहोचत आहेत. यामुळे एकविरा देवी मंदिर परिसरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गांवर अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे. महामार्गावर रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे वाहनचालकांना दीर्घकाळ कोंडीत अडकून पडावे लागलं.

जुन्या मुंबई–पुणे महामार्ग वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Crime News: पुणे हादरले! दिवसाढवळ्या शेतकऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला, दगड-लाठीकाठीने मारहाण अन् कोयत्याने हल्ला

कार्ला फाटा, एकवीरा मंदिर मार्ग आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे वाहतुकीवर ताण निर्माण झालाय. सुट्ट्यांचा शेवटचा आठवडा असल्याने लोणावळा, कार्ला, भुशी धरण आणि इतर पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांचीही मोठी वर्दळ होती.

जुन्या मुंबई–पुणे महामार्ग वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Good News : मान्सून गोव्यात दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान खात्याचा ताजा अंदाज आला समोर

वाहतूक पोलिसांनी कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे सुरू आहे. त्यानंतरही वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. यामुळे अनेक वाहनचालकांना गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागलाय. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि भाविक-पर्यटकांची उसळलेली गर्दी उसळली आहे. यामुळे जुना मुंबई–पुणे महामार्ग रविवारी दिवसभर गजबजलेला दिसून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com