Crime News: पुणे हादरले! दिवसाढवळ्या शेतकऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला, दगड-लाठीकाठीने मारहाण अन् कोयत्याने हल्ला

Pimpari Chichwad Crime News: पिंपरी- चिंचवडमध्ये भयंकर घटना घडली. दिवसाढवळ्या शेतकऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दगड-लाठकाठी आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला.
Crime News: पुणे हादरले! दिवसाढवळ्या शेतकऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला, दगड-लाठीकाठीने मारहाण अन् कोयत्याने हल्ला
Pimpari Chichwad Crime NewsSaam Tv
Published On
  • पुण्याजवळील मरकळ येथे भयंकर घटना

  • शेतकरी आणि दोन जणांवर जीवघेणा हल्ला

  • हल्लेखोरांनी लाठी, काठी, दगड आणि कोयत्याने मारहाण केली

  • या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी- चिंचवड शहराला लागून असलेल्या मरकळ भागात एका शेतकऱ्यावर आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. लाठी, काठी, दगड आणि कोयत्याने दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. मरकळ येथील बी टी कंपनी टोळीच्या गुंडांकडून त्यांना ही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी आळंदी पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मरकळ येथील बी टी कंपनी टोळीच्या गुंडांनी एका शेतकऱ्यासोबत असलेल्या जुन्या किरकोळ वादातून ज्ञानेश्वर महादेव पाचपुते या शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. बी टी कंपनीचे गुंड शेतकरी ज्ञानेश्वर महादेव पाचपुते आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांवर लाठी, काठी, दगड आणि कोयत्याने जिवघेणा हल्ला करत असतानाची दृश्य एका संजग नागरिकांने आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केली आहे. १ जूनला मरकळ आळंदी रोडवरील कमळजाई या ठिकाणी ही घटना घडली.

Crime News: पुणे हादरले! दिवसाढवळ्या शेतकऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला, दगड-लाठीकाठीने मारहाण अन् कोयत्याने हल्ला
Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जागा वाटपावरही झाला निर्णय; अजित पवार काय म्हणाले?

आम्ही बी टी कंपनीचे आहोत, मरकळ येथे फक्त बी टी कंपनीचीच हवा चालते अस दम देत बी टी कंपनी टोळीच्या गाव गुंडांनी शेतकरी ज्ञानेश्वर महादेव पाचपुते आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात ज्ञानेश्वर महादेव पाचपुते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वायसीएम रुग्णालय उपचार करण्यात येत आहे.

Crime News: पुणे हादरले! दिवसाढवळ्या शेतकऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला, दगड-लाठीकाठीने मारहाण अन् कोयत्याने हल्ला
Pimpari- Chinchwad: पुण्यात AI चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सीट बेल्टच्या सहाय्याने घेतला गळफास

या प्रकरणात ज्ञानेश्वर महादेव पाचपुते यांनी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून बजरंग बाळासाहेब टाकळकर, निखिल धर्मराज टाकळकर, विलास तुकाराम टाकळकर, प्रजल ज्ञानेश्वर टाकळकर, अभिषेक राजेंद्र लोखंडे, पंकज भाऊसाहेब साळुंखे या ६ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Crime News: पुणे हादरले! दिवसाढवळ्या शेतकऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला, दगड-लाठीकाठीने मारहाण अन् कोयत्याने हल्ला
Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com