Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

Palghar Crime: पालघरमध्ये रक्तरंजित थरार घडला. डहाणू येथे घरात घुसून नवरा-बायकोवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपीने विष प्यायले.
Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला
Palghar CrimeSaam tv
Published On
  • पालघरच्या डहाणू तालुक्यात हत्याकांडाची भयंकर घटना

  • करणीच्या संशयातून शेजारच्या दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला

  • एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर

  • हल्ल्यानंतर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये एका तरुणाने घरात घुसून शेजारच्यांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पालघर जिल्हा हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या डहाणू तालुक्यातील सरावली पाटीलपाडा येथे ही घटना घडली. करणीच्या संशयातून शेजारी राहणाऱ्या दाम्पत्ंयावर एका तरुणाने घरात घुसून कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी गंभीर जखमी झालेल्या गुलाब भरकुड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांचा नवरा सुरेश भरकुड यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला
Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पत्नीच्या मृत्यूसाठी भरकुड दाम्पत्य करणी करत असल्याचा संशय आरोपी विलास नामकोडा याला होता. भरकुड दाम्पत्यांवर हल्ला केल्यानंतर आरोपीनेही विषप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात विविध कमलांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला
Crime: लग्नात रक्तरंजित थरार! आवडतं गाणं न वाजवल्यानं वऱ्हाडी संतापले, नवरदेवाच्या काकाची चाकूने वार करत हत्या

अमरावतीत तरुणाची हत्या -

अमरावतीमध्ये तरुणावर भरचौकात धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाला जागीच संपवण्यात आले. या घटनेमुळे अमरावतीत खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या जय सियाराम नगर परिसरात ही घटना घडली. प्रज्वल खरे (२६ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव होते. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यामधील दोघांना अटक करण्यात आली. तर उर्वरित ५ आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला
Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com