

अमरावतीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं
जय सियाराम नगर परिसरात घडली घटना
प्रज्वल खरे या २६ वर्षीय असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते
अमरावतीमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. बहिणीची छेड का काढली? असा जाब विचारल्यामुळे तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्याकांडाच्या या घटनेमुळे अमरावती हादरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली तर इतर ५ आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या जय सियाराम नगर परिसरात ही घटना घडली. प्रज्वल खरे (२६ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रज्वल खरेची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत २ संशयित आरोपींना अटक केली. यामध्ये सात आरोपी होते तर पाच जण फरार आहेत.
आपल्या बहिणीचे AI मार्फत अश्लील व्हिडिओ आरोपीने बनवले होते. या संदर्भात आरोपीला जाब विचारण्यासाठी प्रज्वल गेला होता. मात्र त्याची हत्या करण्यात आली. भरचौकात प्रज्वलवर सात जणांनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तेजसने जागीच प्राण सोडले. मुख्य हल्लेखोरांचा शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.