Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Mumbai Meera Road Murder News : मुंबईतील मीरा रोड परिसरात आईच्या लिव्ह-इन पार्टनरने ४ वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
MIRA ROAD HORROR: MOTHER'S LIVE-IN PARTNER ARRESTED FOR ALLEGEDLY KILLING 4-YEAR-OLD BOY
MIRA ROAD HORROR: MOTHER'S LIVE-IN PARTNER ARRESTED FOR ALLEGEDLY KILLING 4-YEAR-OLD BOYSaam Tv
Published On
Summary
  • मीरा रोडमध्ये 4 वर्षीय मुलाची हत्या

  • आरोपीने क्षुल्लक कारणावरून मुलाला अमानुष मारहाण केली

  • आईच्या लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या

  • पोलिसांनी केली अटक

Mumbai Mira Road Kashimira Murder Case मुंबईतील मीरा रोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या कथित बॉयफ्रेंडने तिच्या 4 वर्षांच्या निरागस मुलाची निर्घृण हत्या केली. क्षुल्लक कारणांवरुन ही हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या आईचा बॉयफ्रेंड शंभू शर्माला (Shambhu Sharma) अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाची आई शंभू शर्मा याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. घटनेच्या दिवशी आरोपी आणि मुलगा घरात असताना क्षुल्लक कारणांवरुन आरोपीने मुलाला अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.

MIRA ROAD HORROR: MOTHER'S LIVE-IN PARTNER ARRESTED FOR ALLEGEDLY KILLING 4-YEAR-OLD BOY
Gold Rate Update : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे भाव

मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करताना मुलाच्या शरीरावर संशयास्पद जखमा आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू गंभीर दुखापतींमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

MIRA ROAD HORROR: MOTHER'S LIVE-IN PARTNER ARRESTED FOR ALLEGEDLY KILLING 4-YEAR-OLD BOY
Monsoon Update : पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सून धडकणार, राज्यात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा अंदाज

त्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे शंभू शर्मा याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मुलाला मारहाण केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी, २ जून रोजी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपीने नेमक्या कोणत्या कारणातून मुलावर हल्ला केला, यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com