ठाकरे गटाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनच्या आवारातच हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

navi mumbai crime news : ठाकरे गटाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनच्या आवारातच हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही.
Navi Mumbai
navi mumbai crime newsSaam tv
Published On
Summary

नवी मुंबईत ठाकरे गटाच्या नेत्यावर हल्ला

तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली घटना

ठाकरे गटाच्या नेत्यावर हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईत ठाकरे गटाचे नेत्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील तुर्भे पोलीस स्टेशनच्या आवारातच गुरुवारी दुपारी हल्ला झाला आहे. या घटनेने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील ठाकरे गटाचे उप शहर प्रमुख महेश कोटीवाल यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही महिलांनी तुर्भे पोलीस ठाण्याच्या आवारात त्यांच्यावर हल्ला केला.

Navi Mumbai
Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

अचानक हल्ला झाल्याने पोलीस स्टेशनच्या आवारात एकच खळबळ उडाली आहे. महेश कोटीवाल नवी मुंबई ठाकरे गटाचे उप शहर प्रमुख असून ते तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते. पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना काही महिलांनी हल्ला केला. हल्ल्याचे कारण अजूनही स्पष्ट नाही. संबंधित महिलांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महेश कोटीवाल पोलिस ठाण्यातच बसले आहे.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'महेश कोटीवाल यांच्यासोबत काही कार्यकर्ते होते. ते पोलीस स्टेशनच्या आवारात उभे होते. त्यावेळी दोन महिलांनी महेश कोटीवाल यांना घेरलं. त्यानंतर कोटीवाल यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दोन्ही महिला आणि महेश कोटीवाल यांच्याशी वाद झाला. बाचाबाचीनंतर दोन्ही महिलांनी महेश कोटीवाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही जण वाद सोडवण्यास आले. त्यानंतरही मारहाण सुरू होते. पुढे एक पोलीस कर्मचाऱ्याने दोघांमधील वाद सोडवला.

Navi Mumbai
दीड फूट जागेवरून वाद टोकाला गेला; पोलीस कर्मचाऱ्यांकडून शेजारी कुटुंबाला बेदम मारहाण, गरोदर महिलेलाही सोडलं नाही

महेश कोटीवाल यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही महिलांनी कोटीवाल यांना मारहाण का केली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच या प्रकरणात महेश कोटीवाल यांच्याकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com