Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जागा वाटपावरही झाला निर्णय; अजित पवार काय म्हणाले?

Ajit Pawar On Pimpari-Chinchwad Election: पिंपरी-चिंचवड महानगर पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. दोन्ही राष्ट्रवादीमधील जागा वाटपाचा तिढा देखील सुटला आहे.
Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जागा वाटपावरही झाला निर्णय; अजित पवार काय म्हणाले?
Ajit Pawar NewsSaam Tv
Published On

Summary -

  • पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र

  • अजित पवार यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची केली घोषणा

  • जागावाटपाचा निर्णय देखील झाला

  • १८ ते २० जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आहेत. दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पिंपरी-चिंचवड महानगर पालिका निवडणूक एकत्रित लढतील, असे अजित पवार यांनी सांगितले. तसंच, दोन्ही राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा निर्णय देखील झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या सभेत अजित पवारांनी सांगितले की, 'पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळ आणि तुतारी एकत्र लढत आहेत. हे कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मनात होती. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कठोर आणि व्यावहारिक निर्णय घेण्याची गरज असते. त्यामुळे आमचे एकत्र येणं हे राज्याच्या हितासाठी आहे.'

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जागा वाटपावरही झाला निर्णय; अजित पवार काय म्हणाले?
Maharashtra Politics: ठाकरेंचं ठरलं, जागावाटपावर अडलं? मराठी पट्ट्यासाठी ठाकरेंमध्ये रस्सीखेच?

पिंपरी चिंचवड शहर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने मतांची विभागणी कमी होणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे. शरद पवार गटाने अजित पवार गटाकडे जवळपास २९ ते ३० जागा मागितल्या होत्या मात्र प्रत्यक्षात त्यांना १८ ते २० जागा देण्यात येतील आणि आज दुपारपर्यंत जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात येईल अशी माहिती देखील योगेश बहल यांनी दिली.

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जागा वाटपावरही झाला निर्णय; अजित पवार काय म्हणाले?
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; तिकीट कापल्याने अनेक नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्री

त्याचबरोबर योगेश बहल यांनी पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 20 आणि 9 मधील मैत्रीपूर्ण लढती वर देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादीचा पूर्ण पॅनल मागच्या वेळेस निवडून आला त्यामुळे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह शरद पवार गटाने धरु नये. तसेच प्रभाग क्रमांक 20 मधील शरद पवार गटाचे उमेदवार सुरक्षेला शीलवंत यांनी मागची पिंपरी विधानसभा निवडणूक लढवल असल्याने त्यांनी महापालिका निवडणूक न लढवता विधानसभेची तयारी करावी असा आव्हान देखील योगेश बहल यांनी केला आहे.

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जागा वाटपावरही झाला निर्णय; अजित पवार काय म्हणाले?
Pune Politics: पुण्यात काँग्रेस-शिवसेना अन् मनसे एकत्र निवडणूक लढवणार, जागा वाटपाचा तिढा सुटला; आज होणार घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com