शेतकरी कर्जमाफीनंतर राज्य सरकारनं पशुपालक, कुक्कुटपालकांसाठी घेतला मोठा निर्णय,बळीराजाला आले 'अच्छे दिन'

State Announces Major Decision for Animal Husbandry Sector : शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर, महाराष्ट्र सरकारने पशुधन आणि कुक्कुटपालन शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मनमानी कर आकारणीला आळा घालण्यासाठी आता राज्यभरात एकसमान कर आकारणी लागू केली जाणार आहे.
State Announces Major Decision for Animal Husbandry Sector :
Maharashtra uniform tax policy for livestock farmerssaam tv
Published On
Summary
  • राज्य सरकारने पशुपालक आणि कुक्कुटपालकांसाठी मोठा निर्णय घेतला.

  • राज्यभरात एकसमान कर आकारणी लागू करण्याच्या सूचना

  • पशुपालक आणि कुक्कुटपालन व्यावसायिकांना कर सवलतींचा प्रत्यक्ष लाभ

शेतकरी कर्जमाफीचा शासनाने निर्णय जाहीर केल्यानंतर सरकारने आता राज्यातील पशुपालक आणि कुक्कुटपालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पशुपालकांकडून आता राज्यभरात एकसमान कर आकारणी केली जाणार आहे. पशुपालकांकडून अनेक ग्रामपंचायती मनमानी पद्धतीने अधिक दराने कर आकारले जात असल्याच्या तक्रार आल्या आहे.

State Announces Major Decision for Animal Husbandry Sector :
Silver New Rule: लाख मोलाच्या चांदीबाबत केंद्र सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

या पार्श्वभूमीवर राज्यभर एकसमान कर आकारणी लागू करावी, पशुपालक व कुक्कुटपालन व्यावसायिकांना कर सवलतीचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासंदर्भात पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिलेत. शासन निर्णयानुसार पशुपालन व्यवसायाला स्वतंत्र व्यवसाय न समजता कृषी व्यवसाय समजून त्याच दराने ग्रामपंचायत कर आकारणी करावी असं नमूद करण्यात आले आहे.

परंतु राज्यातील विविध ग्रामपंचायतींकडून पशुपालक व पोल्ट्री व्यावसायिकांकडून वेगवेगळ्या दराने कर आकारला जात होता. विशेषतः शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांवर अधिक आर्थिक भार टाकला जात होता. पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार मानला जातो. दूध, अंडी, कुक्कुटपालन आणि इतर पशुधन व्यवसायातून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो.

State Announces Major Decision for Animal Husbandry Sector :
Government Order: सरकारनं कर्मचाऱ्यांवर लादले कडक नियम; जेवणासाठी घरी जाण्यास मनाई, परदेश दौऱ्यावरही बंदी

मात्र, खाद्य दरवाढ, उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे पशुपालक आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात ग्रामपंचायतींकडून वाढीव कर आकारणी केली जात असल्यानं त्यांच्यावर आर्थिक भार पडत होता. यामुळे पशुपालकांमध्ये नाराजी वाढत होती. याप्रकरणात पशुसंवर्धन विभागाने थेट हस्तक्षेप करत सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर ग्रामपंचायतींना आदेशित करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत पात्र पशुपालकांना कृषी व्यवसायाप्रमाणेच करसवलतीचा लाभ द्यावा, असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com