Government Order: सरकारनं कर्मचाऱ्यांवर लादले कडक नियम; जेवणासाठी घरी जाण्यास मनाई, परदेश दौऱ्यावरही बंदी

Government Order For Employees: सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. इंधन, विजेची बचत व्हावी हा या निर्णयामागील उद्देश आहे.
Government Order For Employees:
Puducherry Government introduces new administrative guidelines, imposing strict restrictions on employeessaam tv
Published On
Summary
  • सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कडक नवीन नियम लागू केले आहेत.

  • कर्मचाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर पुढील सहा महिन्यांसाठी बंदी

  • इंधन, वीज आणि सरकारी संसाधनांची बचत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांवर नवीन नियम लादले आहेत. कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. यासह कर्मचाऱ्यांना जेवणासाठी घरी जाण्यास मनाईही करण्यात आली आहे. पुदुचेरी सरकारनं राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांवर हे निर्बंध लादले आहेत. इंधन, वीज आणि संसाधनांचा योग्य आणि बचत व्हावी यासाठी राज्य सरकारनं नवीन नियम लागू केलेत.

Government Order For Employees:
देशावर घोंघावतंय सर्वात मोठं संकट! 'गॉडझिला'मुळे धडकी भरली, पुढील ३ महिने अत्यंत महत्त्वाचे; नेमका काय दिला इशारा?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन संकटापासून वाचवण्यासाठी आणि परकीय चलन बचत करण्यासाठी देशातील नागरिकांना आवाहन केलंय. त्याच पार्श्वभूमीवर पुदुचेरी येथील सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. पुदुचेरीचे कामगार आणि प्रशासनिक सुधार विभागाचे अवर सचिव एस. मुरुगेसन यांनी सर्व शासकीय विभागांना, कार्यालयांना, सार्वजनिक क्षेत्राच्या उपक्रमांना आणि स्वायत्त संस्थांना एक परिपत्रक पाठवले आहे.

Government Order For Employees:
रात्री ८ वाजताच दुकानांची शटर करा बंद! सरकारचा नागरिकांना आदेश, शेजारील देशात काय घडतंय?

या परिपत्रकानुसार, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारनं हा निर्णय घेतला. पंतप्रधानांनी देशवाशियांना केलेल्या आवाहनानंतर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढवा बैठकीत कर्मचाऱ्यांबाबत नियम लागू करण्यात आलेत.

आवश्यक नसलेले दौऱ्यांवर बंदी

सरकारकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आवश्यक नसलेल्या परदेश दौऱ्यावर, अभ्यास दौरे आणि सल्लामसलतीचे दौरे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी स्थगित करावेत. यासह इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी शासकीय वाहनांचा विवेकपूर्ण वापर करण्याचे आणि 'वाहन पूलिंग' प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश परिपत्रकात देण्यात आलेत. अधिकाऱ्यांना अनावश्यक शासकीय प्रवास टाळण्याचा आणि शक्य असेल तेव्हा आंतरविभागीय बैठका, आढावा सत्रे व समन्वय बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्याव्यात असा सल्लाही सरकारच्या परिपत्रकात देण्यात आलेत.

सार्वजनिक वाहनांचा वापर करा

परिपत्रकानुसार सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनी कामांसाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. यासह सरकारनं विजेची बचत करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले आहे. कार्यालयात ज्या इलेक्ट्रिक वस्तूंची गरज नाही म्हणजेच लाईट, एअर कंडीशनर आणि कॉम्प्युटर आदी इलेक्ट्रिक साधनाचा वापर करायचा नसेल ते बंद करावीत.

दुपारी जेवणाच्या वेळेत विनाकारण कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेर जाऊ नये. कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच जेवण करावे. अवर सचिव एस. मुरुगेसन यांनी सांगितलं की, सर्व शासकीय विभागीय सचिवांना आणि प्रमुखांना आपल्या कार्यालयात नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com