Good News : मान्सून गोव्यात दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान खात्याचा ताजा अंदाज आला समोर

IMD Monsoon Update : गोव्यात मान्सूनचे आगमन झाले असून आता महाराष्ट्रातही पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा संपणार का, जाणून घ्या ताजा अंदाज.
Monsoon in Goa, Maharashtra Monsoon Update
Monsoon in Goa, Maharashtra Monsoon UpdateSaam TV Marathi
Published On

सचिन जाधव | पुणे प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Maharashtra Monsoon Update : मान्सून केरळमध्ये दाखल (Rain Updates) झाल्याची अधिकृत माहिती हवामान विभागाने गुरूवारी केली. त्यानंतर आता मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून केरळमध्ये दाखल (When will monsoon reach Maharashtra) झाला आहे. मान्सूनसाठी वातावरण पोषक असून पुढील काही दिवसात राज्यात दाखल होईल, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवाला आहे. ( Maharashtra rain alert)

काल केरळमध्ये धडकलेला मान्सून आज गोव्यात (IMD monsoon forecast today) दाखल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, यंदा मान्सूनचे केरळ आणि महाराष्ट्रातील आगमन लांबल्याने बळीराजासह सर्वसामान्यांना पावसाची आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Monsoon in Goa, Maharashtra Monsoon Update
Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

हवामान खात्याने यंदा २६ मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी ४ जून उजाडावी लागली. केरळमधील या विलंबाचा परिणाम महाराष्ट्रातील आगमनावरही झाला आहे. आता राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी अजूनही ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

'एल निनो'चा सावट

यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे देश आणि राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदा देशात ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, जून महिना सुरू झाला तरी पाऊस नसल्याने महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला आहे. अनेक भागांत पाणीटंचाई तीव्र झाली आहे. त्यामुळे आता मान्सून कधी सक्रिय होतो आणि पावसाचा जोर कसा राहतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Monsoon in Goa, Maharashtra Monsoon Update
Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

केरळमध्ये मुसळधार पाऊस

मान्सून अधिकृतपणे भारताच्या केरळ राज्यात दाखल झाला आहे. केरळमधील थेकडी (खेकडी) परिसरासह पर्वतरांगांमध्ये मान्सूनचा मुसळधार पाऊस सुरू झाला असून, येथील धबधबे देखील ओसंडून वाहू लागले आहेत. केरळमधील कोची, मुन्नार, थेकडी आणि पुरामन या प्रमुख शहरांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. यंदा मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Monsoon in Goa, Maharashtra Monsoon Update
Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com