Protest : काँग्रेसविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार, महापौरांसह कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

BJP MLA, Mayor and Workers Detained : कोल्हापुरातील काँग्रेस कार्यालयाच्या दिशेने निघालेला भाजपचा निषेध मोर्चा पोलिसांनी अडवला. निषेधाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच एक आमदार, महापौर आणि पक्षाचे अनेक कार्यकर्ते यांना ताब्यात घेण्यात आले.
BJP MLA, Mayor and Workers Detained :
BJP PROTEST FAILS IN KOLHAPUR; MLA, MAYOR AND PARTY WORKERS DETAINED BY POLICEsaam tv
Published On
Summary
  • काँग्रेसच्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपने कोल्हापुरात मोर्चा काढला.

  • काँग्रेस कार्यालयापूर्वीच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवले.

  • भाजपचे आमदार, महापौर आणि अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात भाजप आमदार आणि पक्ष कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पंरतु भाजप कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयापर्यंत पोहोचलेच नाहीत. काँग्रेस कमिटी कार्यालय १ किलोमीटर असतानाचा पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

BJP MLA, Mayor and Workers Detained :
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राजकारण नको; काँग्रेसच्या राज्यातही पेपरफुटी, भाजपचा आरोप

सकाळी भाजप आमदार अमल महाडिक, महापौर रुपरणी निकम यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कमिटी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. परंतु भाजप कार्यकर्ते काँग्रेस कमिटी कार्यालयपर्यंत पोहोचलेच नाहीत. कारण काँग्रेस कार्यालयापर्यंत पोहचण्याआधीच भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आमदारासह महापौर रुपरणी निकम यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये भरलं आणि दुसऱ्या ठिकाणी नेलं.

पोलिसानी आंदोलकांना रस्त्यावर न थांबता संविधान चौकातील आतील भागात आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. आता भाजपचे कार्यकर्ते संविधान चौकात 7 वाजेपर्यंत आंदोलन करतील. दरम्यान भाजप आमदारासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली.

BJP MLA, Mayor and Workers Detained :
'महाराष्ट्राचा धुरंधर नेता'; CM साठी चक्क राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शहरभर बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात खळबळ

विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ठाकरे बंधू मैदानात

विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. मुंबई येथील दादर येथील शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर पर्यंत मोर्चा काढणार असल्याची धोषणा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेतून केली आहे.

विद्यार्थ्यावरील लाठीचार्ज हल्ला ! निषेधार्थ परभणीत कडकडीत बंद

दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यावर अमानुषपणे लाठीचार्ज, मारहाण केली. याच्या निषेधार्थ परभणी शहरात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या महाराष्ट्र बंद हाकेला ओ देत आला. पूर्णा तालुका वंचित बहुजन आघाडीस सहकार्य करत व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

BJP MLA, Mayor and Workers Detained :
Fenugreek Seeds: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीदाणे खा; ५ समस्यांपासून मिळेल आराम

सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

दुसरीकडे विरामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विरारमध्ये वंचितचे आक्रमक आंदोलन झाले. यावेळी पोलिसी ठाण्याबाहेर आंदोलक आक्रमक झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com