विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राजकारण नको; काँग्रेसच्या राज्यातही पेपरफुटी, भाजपचा आरोप

JP Nadda on Paper Leak Row: गेल्या दहा वर्षात पेपर फुटण्याच्या १५२ घटना घडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांचे राजकारण केले जाऊ नये.
JP Nadda on Paper Leak Row:
BJP Counters Rahul Gandhi, Says Paper Leaks Happened During Congress Rule Toosaam tv
Published On
Summary
  • राहुल गांधी यांनी गेल्या दहा वर्षांत 152 पेपरफुटीच्या घटना

  • भाजपचे जे. पी. नड्डा यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

  • विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करू नये, असे नड्डा यांनी म्हटले.

पेपरफुटीच्या मुद्द्यावरून गल्ली ते दिल्ली आंदोलन चालू आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर घाणाघाती आरोप केले. गेल्या दहा वर्षात १५२ पेपर फुटीच्या घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींच्या या आरोपाला केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी उत्तर देत विरोधकांवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत बोलताना नड्डा म्हणाले की, या मुद्द्याचे राजकारण केले जाऊ नये. पेपरफुटी ही एक गंभीर बाब असून त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक असल्याचं म्हटलंय.

त्याचेळी जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर आरोपही केला. नड्डा पुढे बोलताना म्हणाले की, आज दुपारी ४ वाजता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक सादरीकरण केलं. यात त्यांनी पेपर फुटण्याच्या सुमारे १५२ घटनांचा उल्लेख केला. ही बाब चौकशीच्या कक्षेत येते. सरकार यातील प्रत्येक पैलूबाबत आपली भूमिका जनतेसमोर मांडेल.

सरकार संसदेत प्रश्नपत्रिका फुटण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित या मुद्द्यावर राजकारण केले जाऊ नये, असे आवाहन त्यांनीही केले. काँग्रेसशासित राज्यांमध्येही प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना घडल्या आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी केलाय.

राहुल गांधींनी विद्यार्थ्यांच्या वतीने सरकारसमोर मांडलेल्या तीन मागण्या

आज दुपारी ४ वाजता दिल्लीत, 'नीट' (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. सध्याच्या सरकारच्या काळात देशाची शिक्षण व्यवस्था भ्रष्ट आणि फेरफारयुक्त झाली आहे. यासह राहुल गांधींनी विद्यार्थ्यांच्या वतीने सरकारसमोर तीन मागण्या मांडल्या. पहिली मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. 'नीट' (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे राहुल गांधींचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com