'महाराष्ट्राचा धुरंधर नेता'; CM साठी चक्क राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शहरभर बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics: राज्यातील राजकारण घडणाऱ्या घटना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कार्यकर्ते आपल्या पक्षातील आपल्या आवडत्या नेत्यासाठी नेहमी बॅनरबाजी करताना दिसतात. पण दुसऱ्या पक्षातील नेत्यासाठी दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्याने बॅनरबाजी केल्याच तुम्ही पाहिलंय का?
CM Devendra Fadnavis discusses proposed DELTA law to enable blockchain-based land asset tokenization in Maharashtra.
saam tv
Published On

राजकरणात कोण कधी कोणाचा मित्र होईल आणि कोणकोणाचा शत्रू होईल, याचा नेम नाही. राजकरणातील घडणाऱ्या घटना पाहून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. एकीकडे शरद पवार गट एनडीएमध्ये जाणार असल्याची चर्चा चालू आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील नेते आधीच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवताना दिसत आहेत. याचं कारण ठरलंय मुंबईभर लावण्यात आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांचे बॅनर्स.

CM Devendra Fadnavis discusses proposed DELTA law to enable blockchain-based land asset tokenization in Maharashtra.
Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

आपल्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी बॅनरबाजी करत असतात. पण दुसऱ्या पक्षातील नेत्याने अशी बॅनर लावणं तुम्ही कधी पाहिलं नसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई शहरभर बॅनर्स लावलेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख "महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर नेते" असा करण्यात केलाय.

CM Devendra Fadnavis discusses proposed DELTA law to enable blockchain-based land asset tokenization in Maharashtra.
CJP च्या आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

"महाराष्ट्राच्या राजकारणातील 'धुरंधर' नेते, आधुनिक चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" असा उल्लेख करण्यात आलाय. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून सलीम सारंग यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. भाजप प्रवेशाच्या शक्यतेपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपर्कातील चर्चांपर्यंत अनेक राजकीय तर्क-वितर्क रंगले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत ते नाराज असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

CM Devendra Fadnavis discusses proposed DELTA law to enable blockchain-based land asset tokenization in Maharashtra.
CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाचे देशभर पडसाद; २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक

अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईभर झळकलेले हे शुभेच्छांचे बॅनर्स राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. सध्या या बॅनर्सची छायाचित्रे आणि संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विविध स्तरांवर त्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com