CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाचे देशभर पडसाद; २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक

Maharashtra Bandh : विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने 23 जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिलीय.
Maharashtra Bandh
MAHARASHTRA BANDH ON JULY 23: NATIONWIDE REACTION TO DELHI POLICE ACTION DURING CJP PROTESTsaam tv
Published On
Summary
  • दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण तापले आहे.

  • वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

  • विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस लाठीचार्जचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता देशभर पसरताना दिसत आहे. आता आंदोलनात विरोधी राजकीय पक्षांनी थेट सहभाग घेतल्याचं दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांकडून झालेल्या मारहाणीनंतर देशातील जनता मोदी सरकारवर टीका करत आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आता राजकीय पक्षाचे नेतेही दिल्लीत पोहोचत आहेत. ठाकरे गट शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उद्या दिल्लीत जाणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून थेट महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय.

Maharashtra Bandh
मोठी बातमी! शरद पवार थेट जंतर मंतरवर; अभिजित दिपकेंची घेतली भेट

जंतर-मंतर आणि संसद परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या अमानुष वागणुकीविरोधात राजकीय पक्षाकडून टीका केली जातेय. आता विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिलीय. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Maharashtra Bandh
Devendra Fadnavis: आंदोलनात बाहेरचे लोक घुसलेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन २३जुलैच्या 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून आता महाराष्ट्राच्या गल्लीतही बंदचा संताप पाहायला मिळतोय.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

केंद्र सरकारने भारतीय नागरिकांवरच हल्ला घडवून आणला. हेच सरकार होतं, ज्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वेगवेगळी नावे दिली आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अर्बन नक्षली देखील या सरकारनं म्हटलंय.

अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी कार्यकर्ते रस्त्यावर

दिल्लीच्या जंतर-मंतर येथील आंदोलनाला अहिल्यानगरच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. रिमझिम पावसातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंबेडकरी संघटनांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले. 'मोदी हटाव देश बचाव', 'हम क्या चाहते आझादी', 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com