Kokan Railway: कोकण रेल्वेसाठी स्वंतत्र आर्थिक तरतूद करा; कोकणवासियांची मागणी

Kokan Railway News: कोकण रेल्वेच्या विस्तारासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी केली जात आहे. अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला फार निधी मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही मागणी केली जात आहे.
Kokan Railway
Kokan RailwaySaam tv
Published On
Summary

कोकण वरेल्वेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत समाविष्ट करा

कोकण रेल्वे प्रवासी समितीची मागणी

कोकण रेल्वेचा विस्तार व्हावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. दरम्यान, आता अर्थसंकल्पात अनेक रेल्वेमार्गाची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये कोकणासाठी फार काही निधी मिळाला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच

केवळ घोषणा न करता कोकण रेल्वेसाठी स्वतंत्र आणि भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी आहे.

Kokan Railway
Railway-Truck Accident: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात; ट्रेन आणि ट्रकची जोरदार टक्कर, बाईकचा चुराडा, Video व्हायरल

अर्थमंत्र्यांनी नवीन जलदगती रेल्वे मार्गांची घोषणा केली. परंतु कोकण रेल्वेला काही भरीव निधी मिळाला नसल्याचे समोर आले आहे. तसेच रेल्वे मंत्र्यांनीही कोकण रेल्वेसाठी नेमकी किती रक्कम देण्यात येईल त्याबाबत स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यासाठी केवळ महाराष्ट्राची परवानगी बाकी आहे, असे मागील वर्षापर्यंत ऐकण्यात येत होते. परंतु मे २०२५ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यालाही परवानगी दिलेली आहे.परंतु त्यानंतर अद्याप पुढील प्रक्रिया होताना दिसत नाही. आजही रेल्वे मंत्र्यांनी कोकण रेल्वे विलीनीकरणावर एकही शब्द न उच्चारणे दुर्दैवी आहे.

Kokan Railway
Vande Bharat: वंदे भारतबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, २४ डब्याची ट्रेन लवकरच धावणार; आता प्रवास होणार आणखी सुसाट

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण, प्रवासी भाड्यावरील ४०% अधिभार काढणे आणि सावंतवाडी टर्मिनस व कोचिंग डेपो यासाठी निधी मिळणार नसेल तर संबंधित खासदारांनी सदर अर्थसंकल्पात कपातीची मागणी करून शासनाचे लक्ष वेधून घ्यावे व पहिल्या टप्यात किमान काही हजार कोटींची तरतूद कोकण रेल्वेसाठी करून घ्यावी. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांची मागणी आहे. जेणेकरुन कोकण रेल्वेचा विस्तार होईल.

Kokan Railway
Railways Rule: जर ट्रेन चुकली तर त्याच तिकिटावर दुसऱ्या गाडीनं प्रवास करता येतो? काय आहे रेल्वेचा नियम?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com