Vande Bharat: वंदे भारतबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, २४ डब्याची ट्रेन लवकरच धावणार; आता प्रवास होणार आणखी सुसाट

Vande Bharat Sleeper Increase Coaches: वंदे भारत ट्रेनबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे कोच वाढवण्यात येणार आहे. आता २४ कोचची ट्रेन सुरु केली जाणार आहे.
Vande Bharat
Vande BharatSaam Tv
Published On
Summary

वंदे भारत स्लीपर ट्रेनचे कोच वाढवणार

२४ कोच असलेली ट्रेन बनवणार

रेल्वे प्रवाशांना फायदा होणार

देशातील सर्वात वेगवान ट्रेन ही वंदे भारत आहे. देशातील सर्वात पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदेभारत स्लीपर गुवाहाटी ते हावडापर्यंत चालणार आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनला खूप प्रवाशांनी चांगली पसंती दिली आहे. पहिल्याच दिवशी ट्रेनचे तिकीच अवघ्या काही मिनिटातच फुल झाले. यानंतर आता भारतीय रेल्वेने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Vande Bharat
Railway-Truck Accident: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात; ट्रेन आणि ट्रकची जोरदार टक्कर, बाईकचा चुराडा, Video व्हायरल

रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये कोच वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन अजूनच जास्त मोठी होणार आहे. आणखी प्रवाशी या ट्रेनने प्रवास करु शकणार आहेत. यामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे प्रवाशांना आणखी चांगल्या सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु झाल्यानंतर १० दिवसातच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे वंदे भारत स्लीपरमध्ये कोचची संख्या वाढवणार आहे. पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनमध्ये २४ कोच लावण्यात येणार आहे. सध्या या ट्रेनमध्ये १६ कोच आहेत. आणखी ८ कोच वाढवण्यात येणार आहे. लवकरच हे काम सुरु होईल.

किती प्रवासी करु शकणार प्रवास?

सध्या १६ कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण ८२३ बर्थ आहेत. यानंतर २४ कोच असणाऱ्या वंदे भारतमध्ये १,२२४ बर्थ असतील. यामुळे जास्त प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. रेल्वेनुसार, ही २४ कोच असलेली ट्रेन चेन्नई इंटीग्रल कोच फॅक्टीत मेक इन इंडियाअंतर्गत तयार होणार आहे.

Vande Bharat
Western Railway : मुंबईकरांना दिलासा! विरार लोकल आणखी सुसाट धावणार, पश्चिम रेल्वेचं महत्त्वाचं काम पूर्ण, वाचा

कशी असणार ट्रेन?

भारतीय रेल्वे पहिल्यांदाच २४ कोच असलेले ट्रेन डिझाइन करणार आहे. यामध्ये १७ एसी ३ कोच, ५ एसी २ कोट,१ एसी फर्स्ट क्लास कोच आणि १ एसी पॅन्ट्री असणार आहे. यामध्ये तुम्हाला आरामदायी प्रवास करता येणार आहे.

Vande Bharat
Mumbai Railway : मुंबई रेल्वेचा मोठा निर्णय! प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 'तिसरा डोळा'; नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com