Jharkhand Railway Accident
saam tv

Railway-Truck Accident: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात; ट्रेन आणि ट्रकची जोरदार टक्कर, बाईकचा चुराडा, Video व्हायरल

Jharkhand Railway Accident: झारखंडमधील देवघर जिल्ह्यात रेल्वे क्रॉसिंगजवळ एका वेगाने येणाऱ्या ट्रकची आणि ट्रेन धडक झाली. या अपघातात एक दुचाकीचा चुराडा झाला.
Published on
Summary
  • देवघरमध्ये ट्रेन आणि ट्रकची भीषण धडक

  • रोहिणी-नवाडीह रेल्वे क्रॉसिंगजवळ अपघात

  • धडकेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

झारखंडमधील देवघर येथे रेल्वे आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. हावडा-जसिदीह मुख्य रेल्वे मार्गावरील रोहिणी-नवाडीह क्रॉसिंगजवळ एका वेगाने येणाऱ्या ट्रकची ट्रेनशी टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भागाचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक आणि ट्रेनच्या अपघातात एका दुचाकीचेही नुकसान झाले आहे. दरम्यान स्थानिक रहिवासी आणि सुरक्षा दलांच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आलंय.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनशी धडक झाल्यानंत ट्रक अनिंयत्रित होत एका बाईकवर उलटला. यात बाईकचा पूर्ण चुराडा झालाय. दरम्यान तेथील स्थानिकांनी अपघात होताच बचाव कार्य सुरू केलं आणि ट्रकच्या खाली दबलेल्या दोघांना बाहेर काढलं. दोघांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वे अपघातानंतर हावडा-जसीहीह मुख्य रेल्वे मार्गावरील रेल्वेची वाहतूक थांबलीय. दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Jharkhand Railway Accident
देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, बस-टँकरची धडक, ४ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

दरम्यान, रेल्वे क्रॉसिंगवर दुचाकी अडकल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वे आणि स्थानिक प्रशासन क्रेन आणि इतर यंत्रसामग्रीची मदत घेत आहे.अपघाताची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपी पथके घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षा दलांनी गर्दी नियंत्रित केली आणि बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मार्ग साफ करणे आणि रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करणे हे प्राधान्य आहे. गेट बंद असतानाही ट्रक रुळांवर कसा पोहोचला याचाही तपास पोलिस करत आहेत.

Jharkhand Railway Accident
Accident News : मॉर्निंग वॉकला गेली, पुन्हा घरी परतलीच नाही; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं

लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात

जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात एक मोठा अपघात झालाय. लष्कराचे एक वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघातात १० सैनिक शहीद झाले आणि नऊ जण जखमी झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून त्वरीत मदत कार्य सुरू करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com