पावसाचा हाहाकार! महाराष्ट्र्रासह अनेक राज्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra rain today : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा इशारा दिला असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
Maharashtra rain today
Maharashtra rain todayसाम टीव्ही मराठी
Published On

Maharashtra weather forecast, IMD rain alert : भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारीसाठी देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय महाराष्ट्र आणि गोव्यातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील ४८ तासांत हवामानात मोठे बदल होणार आहेत. या हवामान प्रणालीचा प्रभाव केवळ पूर्व भारतातच नव्हे, तर देशातील इतरही अनेक राज्यांवर दिसून येणार आहे. यामुळे सखल भागात पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Maharashtra rain today
Monday Horoscope : सोमवारपासून ४ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; तुमची रास तर यात आहे का? एका क्लिकवर जाणून घ्या

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra rain today
विमानतळावर अचानक झाला गोळीबार; शिंदेंसेनेच्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांतही कोकण आणि गोव्यात सर्वत्र पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगाल, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर ओडिशा आणि गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. बिहार, छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पंजाब, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथेही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra rain today
गर्लफ्रेंड बेस्ट फ्रेंडसोबत निघाली, उद्योगपतीनं कारच्या बोनेटवर उडी मारली; पुढच्याच क्षणी भंयकर घडलं अन् जागेवरच मृत्यू

अंदमान आणि निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, ईशान्य भारत आणि उत्तराखंडच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra rain today
राजकारणात खळबळ! काँग्रेस नेत्यासह मुलाची निर्घृण हत्या; आधी अंदाधुंद गोळीबार, मग धारदार शस्त्रांनी...

अनेक भागांमध्ये २१ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व भारत, उत्तर प्रदेश, ईशान्य भारत आणि हिमालयीन प्रदेशातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, तर तामिळनाडूच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये १९ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहील , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com