विमानतळावर अचानक झाला गोळीबार; शिंदेंसेनेच्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Varanasi airport security incident : वाराणसी विमानतळावर परवानाधारक पिस्तुल हाताळताना अचानक गोळी सुटल्याने दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश केदारनाथ राय यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Varanasi airport security incident
Varanasi airport security incident Saam TV Marathi
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Varanasi airport latest news, Varanasi airport gunfire : वाराणसी विमानतळावर परवानाधारक पिस्तुल हाताळताना अचानक गोळी सुटल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात विमानतळावरील सुरक्षा तपासणी प्रक्रियेत कार्यरत असलेले दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. वाराणसी विमानतळावर शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेवकाच्या परवानाधारक पिस्तुलातून अपघाती गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश केदारनाथ राय हे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. ते वाराणसीहून मुंबईला जाणाऱ्या 'एअर इंडिया एक्स्प्रेस'च्या (IX 1810) विमानाने प्रवास करणार होते. सकाळी सुमारे ९:३० वाजता त्यांनी नियमानुसार चेक-इन काउंटरवर आपल्याकडील परवानाधारक शस्त्राची माहिती दिली. त्यांच्याकडे ७.६२ मिमी पिस्तुल आणि २१ जिवंत काडतुसे होती.

Varanasi airport security incident
Pune BJP : पुण्यात भाजपचा 'ट्रिपल स्ट्रोक'! निवडणुका नसतानाही तिघांचा पक्षात प्रवेश

त्यानंतर अनिवार्य सुरक्षा तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना निर्धारित ठिकाणी नेण्यात आले. तेथे शस्त्राची हाताळणी आणि तपासणी सुरू असताना अचानक पिस्तुलातून एक गोळी सुटली. ती गोळी भिंतीवर/दुसऱ्या दिशेने आदळून परतल्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लागली. या घटनेत रोहित राज आणि सुमन कुमारी हे दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. घटनेनंतर लगेचच दोघांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली असून, पुढील उपचारासाठी वाराणसी येथील 'न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटर'मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Varanasi airport security incident
गर्लफ्रेंड बेस्ट फ्रेंडसोबत निघाली, उद्योगपतीनं कारच्या बोनेटवर उडी मारली; पुढच्याच क्षणी भंयकर घडलं अन् जागेवरच मृत्यू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कमलेश केदारनाथ राय यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, 'ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी'कडून (BCAS) या घटनेची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. विमानतळावर परवानाधारक शस्त्रांची हाताळणी आणि वाहतुकीसंदर्भातील निर्धारित सुरक्षा नियमांचे योग्य पालन झाले होते का, याची चाचपणी केली जात आहे. चौकशीतील निष्कर्षांनुसार पुढील योग्य कारवाई केली जाईल.

Varanasi airport security incident
राजकारणात खळबळ! काँग्रेस नेत्यासह मुलाची निर्घृण हत्या; आधी अंदाधुंद गोळीबार, मग धारदार शस्त्रांनी...

घटना घडल्यानंतर विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणली. या घटनेचा विमानतळाच्या नियमित कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसून, हवाई वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com