राजकारणात खळबळ! काँग्रेस नेत्यासह मुलाची निर्घृण हत्या; आधी अंधाधुंध गोळीबार, मग धारदार शस्त्रांनी...

crime news : पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात काँग्रेस नेते अनिसुर रहमान आणि त्यांचा २४ वर्षीय मुलगा अबू सुफियान यांची हत्या झाली. कारवर गोळीबार केल्यानंतर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Congress Leader Anisur Rahman and His 24 Year-Old Son Abu Sufiyan Brutally killed
Congress Leader Anisur Rahman and His 24 Year-Old Son Abu Sufiyan Brutally killed साम टीव्ही (AI)
Published On

West Bengal Nadia Congress leader double murder case : पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून एक भयानक घडली आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते आणि त्यांच्या मुलाची कार रोखून अज्ञात हल्खोरांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. टीमसी नेता, माजी खासदार आशिष बॅनर्जी यांचा पक्षाच्या कार्यालयातच मृतदेह आढलल्याने आधीच बंगालमध्ये खळबळ उडाली होती. त्यात काँग्रेस नेता आणि त्याच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धावत्या कारवर आधी अंधाधुंध गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर गाडीत अडकलेल्या या बाप-लेकाला धारदार शस्त्रांनी हल्ला केला. ऐन राजकीय रणधुमाळीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण पश्चिम बंगाल हादरले आहे. नादिया परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नक्काईपारा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या हत्याकांडाचा तपास सुरू केला आहे.

Congress Leader Anisur Rahman and His 24 Year-Old Son Abu Sufiyan Brutally killed
Ganeshotsav : यंदाचा गणेशोत्सव १० किंवा ११ नाही तर थेट १२ दिवसांचा! 'हे' कारण समोर; पंचांगकर्त्यांचा मोठा खुलासा

काँग्रेस नेत्याच्या हत्येची ही धक्कादायक ही घटना नक्काईपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेथुआडाहरी रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिसुर रहमान आणि त्यांचा २४ वर्षीय मुलगा अबू सुफियान यांची हत्या झाली. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिसुर रहमान आणि त्यांचा मुलगा सुफियान हे कारमधून प्रवास करत होते. हल्लेखोरांनी आधी त्यांच्या कारला घेरले आणि गोळीबार केला. त्यानंतर, त्यांनी वाहन थांबवून वडील आणि मुलावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

Congress Leader Anisur Rahman and His 24 Year-Old Son Abu Sufiyan Brutally killed
Monday Horoscope : सोमवारपासून ४ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; तुमची रास तर यात आहे का? एका क्लिकवर जाणून घ्या

काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. त्यांनी या प्रकरणी टीएमसी नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. तुरुंगात असलेल्या तृणमूल काँग्रेस नेते जुब्बर शेख यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

Congress Leader Anisur Rahman and His 24 Year-Old Son Abu Sufiyan Brutally killed
पुण्यात एकनाथ शिंदेंना चंद्रकांत पाटलांचा जोरदार धक्का, बड्या महिला नेत्यानं कार्यकर्त्यासोबत सोडली साथ

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी नादिया येथे काँग्रेस नेते अनिसुर रहमान आणि त्यांच्या मुलाच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ही एक घृणास्पद घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये चौधरी म्हणाले, "आम्ही नादिया काँग्रेस नेते अनिसुर रहमान आणि त्यांच्या मुलाच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com