Rashi Bhavishya in Marathi : सूर्याचे नक्षत्र आणि राशी परिवर्तन हे ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सोमवारपासून (१७ ऑगस्ट) ग्रहांचा राजा सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करत आहे. सूर्याच्या या मोठ्या गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडणार आहेत. याचा परिणाम ४ राशींवर होणार आहे. त्यांच्या आयुष्यात पैसा, समृद्धी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सोमवारपासून ४ राशींच्या लोकांचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे. त्यामध्ये वृषभ राशीच्या लोकांना अचानक मोठी व्यवसायिक डील मिळण्याची शक्यता आहे, तर धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर म्हणजेच 'चांदीच चांदी' करणारा ठरेल. सूर्याचे हे गोचर कोणत्या ४ राशींसाठी जॅकपॉट ठरणार आहे आणि तुमच्या राशीवर याचा काय परिणाम होणार आहे, ते सविस्तर जाणून घेऊया...
मेष
सूर्याचे सिंह राशीतील संक्रमण मेष राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. या राशींच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात यश मिळण्याचे संकेत आहेत. १७ सप्टेंबरपर्यंतचा काळ या राशींच्या लोकांसाठी खूप अद्भुत ठरू शकतो. तुमची परिस्थिती चांगली राहील.
सूर्याचे गोचर वृषभ राशीतील व्यक्तींसाठी वरदान ठरेल. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला तुमच्या आईकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. १७ सप्टेंबरपर्यंत जमीन, मालमत्ता आणि वाहने मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला एखादा चांगला जोडीदार मिळू शकतो.
वृश्चिक
या सूर्य संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मेहनतीचे फळ दिसू लागेल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. हे संक्रमण तुमच्या वडिलांसाठीही फायदेशीर ठरेल, त्यांनाही यश मिळण्याची शक्यता आहे.
सूर्याचे हे संक्रमण तुमच्यासाठी मोठे भाग्य घेऊन येईल. १७ सप्टेंबर पर्यंतचा काळ आशादायक दिसत आहे. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक प्रयत्नाचे फळ मिळेल. प्रत्येक पावलावर नशीब तुमच्या सोबत असेल. तुम्हाला करिअरच्या उत्कृष्ट संधी मिळतील.
डिस्क्लेमर (Disclaimer):
या लेखात दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहिती म्हणून दिली जात आहे. कोणत्याही दाव्याची पुष्टी आम्ही करत नाही. यावर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.