Saam Impact : बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन! मुख्यमंत्र्यांचे आदेश; साम टीव्हीचा दणका

Saam Impact News : नागपूरमध्ये बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. सामच्या बातमीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
Saam Impact News
Saam Impact Newsx
Published On
Summary
  • नागपूरमध्ये एका बिअरबारमध्ये सरकारी काम सुरु होते.

  • या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बातमी साम टीव्हीने लावून धरली.

  • साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

Nagpur : उपराजधानी नागपूरमध्ये बारमध्ये बसून सरकारी काम सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बिअर बारमध्ये बसून महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल क्लिअर करण्याचे काम सुरु असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. साम टीव्हीने दाखवलेल्या बातमीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारले. गडचिरोलीमधील चामोर्शी येथील उपअभियंता देवानंद सोनटक्के यांनी बिअर बारमध्ये सरकारी काम करत असल्याचे आणि ठेकेदाराला धरुन बिअर प्राशन केल्याची बातमी सामने दाखवली होती. त्याचा दणका म्हणून आज देवानंद सोनटक्के यांना शासनातर्फे निलंबित करण्यात आले आहे.

Saam Impact News
Car Crash : महिला वकिलाचे कारवरील नियंत्रण सुटले, रिव्हर्स घेताना अपघात; घटनेचा Video Viral

नागपूरमधील बिअरबारमध्ये सुरु असलेल्या कारभाराची राज्यभरात चर्चा पाहायला मिळत आहे. बारमध्ये बसून सरकारी अधिकाऱ्याने शासकीय फाईल दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. बारमध्ये दारूचे घोट रिचवत सरकारी काम होत असल्याचे उघड झाले होते. याच प्रकाराचा नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला.

Saam Impact News
Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये टेबलावर तिघेजण बसलेले दिसतात. या टेबलावर महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल्स दिसतात. या फाईली पाहताना ते काय काम करत होते, याविषयी चर्चा सुरु झाली. हे अधिकारी गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचे म्हटले जात होते. या प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. आता यातील देवानंद सोनटक्के या अधिकाऱ्याचे निलंबन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Saam Impact News
Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com