
अपघातानंतर एका ३० वर्षीय व्यक्तीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेव्हा ड्युटीवर असणारा डॉक्टर झोपी गेला होता. उपचाराअभावी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याने डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे.
Shocking Incident : एका ३० वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला, अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्यक्तीला आपत्कालीन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. ही घटना मेरठमध्ये घडली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मेरठच्या लाला लजपत राय मेमोरियल मेडिकल हॉस्पिटल अँड कॉलेज या रुग्णालयात ३० वर्षीय सुनील कुमार यांना अपघातानंतर उपचारांसाठी आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तेव्हा ड्युटीवर असलेले डॉक्टर झोपले होते. तासभरात सुनील यांना वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. रक्तस्त्राव होऊन सुनील कुमार यांचा आपत्कालीन वॉर्डमध्ये मृत्यू झाला.
ड्युटीवर असलेल्या मेडिकल कॉलेजमधील ज्युनियर रेसिडेंट डॉक्टरचा एसीसमोर झोपलेला कथित व्हिडीओ समोर आला. त्यानंतर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली ज्युनियर डॉक्टरला निलंबित करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने सदर व्हिडीओची दखल घेतली आहे आणि संबंधिज ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर भूपेश कुमार राय यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आयसी गुप्ता यांनी दिली आहे. शोकाकुल कुटुंबाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
रविवारी (२८ जुलै) रात्री एका वाहनाने ३० वर्षीय सुनील कुमार यांच्या दुचाकीला कारने धडक मारली होती. सुनील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर झोपले होते. त्यांना जागे होण्यासाठी आम्ही बरीच वाट पाहिली. इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदतीसाठी विनंती केली. रक्तस्त्राव होत असल्याने सुनील यांचा स्ट्रेचरवरच मृत्यू झाला, असे सुनील कुमार यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.