Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये कोकेन कोणी आणले? पुणे पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

Pune Rave Party News : पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये सिगारेटच्या पाकिटात कोकेनच्या पुड्या लपवल्याचे आढळून आले होते. हे कोकेन कोणी आणले याबाबत गुन्हे शाखेचा तपास सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
Pune Rave Party
Pune Rave Partyx
Published On
Summary
  • पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये कोकेन कोणी आणले होते, याबाबत गुन्हे शाखेचा तपास सुरू

  • कारवाई दरम्यान सिगारेटच्या पाकिटात कोकेनच्या तीन पुड्या लपवून ठेवल्याचे आले आढळून

  • न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ड्रग्स चे सेवन कोणी केले, हे स्पष्ट होणार

  • येत्या २ ते ३ दिवसात अहवाल येण्याची शक्यता

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या ड्रग्स पार्टीमध्ये कोकेन कोणी आणले? याबाबत पुणे गुन्हे शाखेचा तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील ड्रग्स पार्टीमध्ये कोकेन नेमके आणले कोणी? याबाबत पुणे पोलिसांना उत्तर मिळत नाहीये. कारवाईदरम्यान सिगारेटच्या पाकिटात कोकेनच्या तीन पुड्या लपवून ठेवल्याचे आढळून आले. हे कोकेन नेमके कोणी आणले होते, याबाबत गुन्हे शाखेचा तपास सुरु आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ड्रग्सचे सेवन कोणी केले हे स्पष्ट होणार आहे. येत्या २ ते ३ दिवसांत अहवाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune Rave Party
Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांना केला आहे. एकनाथ खडसे यांच्या प्रश्नावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उत्तर दिले आहे.

Pune Rave Party
Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात जी कारवाई झाली, त्याची विस्तृत माहिती आम्ही दिली आहे. पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने कारवाई होईल. पोलीस दलावर कोणीही शंका घेण्याची गरज नाही. पोलिसांकडून फोटो किंवा व्हिडीओ लीक झालेला नाहीये. पोलीस स्टेशनच्या आत रेकॉर्डिंगवर बंदी घातला येत नाही. आम्ही काही लीक करत नाही. जे व्हिडीओ रेकॉर्डिंग करतात, ते आम्ही थांबवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया अमितेश कुमार यांनी दिली आहे.

Pune Rave Party
Death : २५ वर्षीय CA ने आयुष्य संपवलं, फुगे फुगवण्याच्या गॅसची नळी तोंडात घातली अन्... तरुणाची अवस्था पाहून पोलिसही हडबडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com