
पनवेलमधून धक्कादायक प्रकरण समोर
पनवेलच्या चिखली गावातील महिला सरपंच आणि त्यांच्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
जमिनीच्या वादावरुन घेतला टोकाचा निर्णय
विकास मिरगणे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Panvel News : पनवेलमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पनवेल तालुक्यात चिखले गावातील गावच्या सरपंच आणि त्यांचे पती यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. चिखले गावातील गायरान जमीन प्रकरणात दीर्घकाळ न्याय न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.
गायरान जमीन प्रकरणामध्ये न्याय न मिळाल्याने चिखले गावातील महिला सरपंच दिपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी देहत्यागाचा इशारा दिला होता. या प्रकरणी १७ मार्च रोजी दोघांनी उपोषण सुरु केले होते. सलग १२ दिवस उपोषण केल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पण ना बैठक झाली ना निर्णय झाला.
सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने सरपंच दिपाली आणि त्यांच्या पतीने न्याय मिळत नसल्याने आत्महत्येचे प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. आम्हाला देहत्यागाशिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य दोघांनी केले आहे. 'ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या गायरान जमिनीचा साठे करार करुन ती जमीन विकली गेली. २०२० आणि २०२१ मध्ये त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन करण्यात आले. यासाठी जबाबदार असणाऱ्यांमध्ये तत्कालीन सरपंच नामदेव पाटील, ग्रामसेविका स्नेहा मयेकर आणि दत्तात्रय पाठणकर यांची नावे असूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही सरकारी यंत्रणांनी आमच्याकडे पाठ फिरवली आहे. आम्हाला न भेटता थेट बैठकीस नकार दिला जात आहे. त्यामुळे आम्हाला देहत्याग करणे भाग आहे', असे सरपंच आणि त्यांच्या पतीने म्हटले आहे.
संबंधित प्रकरण हे महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असून महसूल विभागाने संबंधित प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे पत्र आमच्या माध्यमातून दिले आहे असे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी या बाबीवर देहत्याग करू नये अशी देखील संबधित प्रकरणी लक्ष घालण्यात येईल असे पत्र प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहे. त्यामुळे या बाबीवर त्यांनी देहत्याग करून अशी देखील विनंती देखील गटविकास अधिकाऱ्यांनी केली त्याचबरोबर यासंबंधी पोलीस प्रशासनाला देखील पत्र देण्यात आले आहे असे देखील गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.