Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Pune Crime News : पुण्यात कौंटुबिक वादाने एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची गळा चिरुन हत्या केली. महिलेच्या मावशीच्या तक्रारीनंतर तिच्या पतीला पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये अटक केली.
Pune Crime News
Pune Crime Newsx
Published On
Summary
  • पुण्यामध्ये कौटुंबिक वादानंतर एकाने त्याच्या पत्नीची हत्या केली.

  • सासरी येण्यास नकार दिल्यामुळे महिलेचा गळा चिरुन हत्या करण्यात आली.

  • महिलेच्या मावशीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीला अटक केली.

Pune : पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौंटुबिक वादातून एकाने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचे उघडकीस आले आहे. हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या मावशीने केलेल्या तक्रारीनंतक पोलिसांनी महिलेच्या नवऱ्याला दोन तासात अटक केली आहे. खूनाच्या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव ममता (वय २१ वर्षे) आणि तिच्या पतीचे नाव प्रेम (वय २७ वर्षे) आहे. कौटुंबिक वादानंतर घरी येण्यास नकार दिल्याने प्रेमने ममतावर हल्ला केला. तिच्या गळ्यावर चाकूने वार करत उत्तमने तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील खांदवेनगर येथे रविवारी (२७ जुलै) दुपारी तीन-सव्वा तीनच्या सुमारास घडली आहे.

Pune Crime News
Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

२०२० मध्ये प्रेम आणि ममता यांचा विवाह झाला होता. प्रेमला दारु पिण्याचे व्यसन होते. या व्यसनापायी तो ममताला सारखा त्रास देत असे. मागील काही महिन्यांपासून ममता तिच्या आईसोबत राहत होती. प्रेम ममताला फोन करुन घरी परत यायला सांगत असे. पण जोपर्यंत दारु सोडणार नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही, असे ममता प्रेमला सांगत नकार देत असे.

Pune Crime News
Panvel Shocking : जमिनीच्या वादावरुन महिला सरपंच अन् पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, पनवेलमधून धक्कादायक प्रकार समोर

ममता तिच्या आई आणि मावशीसोबत राहत होती. मावशीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२७ जुलै) दुपारी प्रेम ममताला सासरी घेऊन जाण्यासाठी तिच्या आईच्या घरी पोहोचला. ममताच्या काकांना फोन करुन तो फोन प्रेमने तिच्या मावशीकडे दिला. फोनवर बोलण्यासाठी त्या खोलीच्या बाहेर गेल्या. त्याचदरम्यान त्यांचा लहान मुलगा घरातून जोरात ओरडत बाहेर आला. त्यावेळेस प्रेमने ममतावर चाकूने हल्ला केला होता.

Pune Crime News
Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये कोकेन कोणी आणले? पुणे पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

खोलीत जाऊन बघितल्यानंतर प्रेमने एका हाताने ममताचे तोंड दाबले आहे आणि दुसऱ्या हाताने तो ममताचा गळा चाकूने चिरत होता. तिच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडत होत्या. त्याने मावशीवरही चाकूने हल्ला केला. मावशीने आरडाओरडा केल्यानंतर प्रेम पळून गेला. त्यानंतर ममता आणि तिच्या मावशीला रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच ममताचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर ममताच्या मावशीने विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये प्रेमला अटक करण्यात आली.

Pune Crime News
Death : २५ वर्षीय CA ने आयुष्य संपवलं, फुगे फुगवण्याच्या गॅसची नळी तोंडात घातली अन्... तरुणाची अवस्था पाहून पोलिसही हडबडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com