मोठी बातमी! 42 दिवसांनंतर भोंदू बाबाला जमीन मंजूर

Fake Godman Rajendra Gadge Bail After 42 Days: संगमनेरमधील भोंदू बाबा राजेंद्र गडगे याला 42 दिवसांनंतर जामीन मंजूर. मंत्रतंत्राने आजार बरे करण्याच्या दाव्यांमुळे गुन्हा दाखल झाला होता.
Self-styled godman Rajendra Gadge walks out on bail after 42 days as investigation delays raise questions.
Self-styled godman Rajendra Gadge walks out on bail after 42 days as investigation delays raise questions.saam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगर/संगमनेर: मंत्रतंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगेला अखेर 42 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. संगमनेर सत्र न्यायालयता झालेल्या सुनावणीत आरोपीचे वकील श्रीपाद कानडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने अटी शर्तींवर गडगेला जामीन मंजूर केलाय. मात्र पोलिसांनी तपास वेळेत पूर्ण न केल्याने आरोपीला जामीन मिळण्यास मदत झाल्याचा आरोप फिर्यादी रंजना गवांदे यांनी केलाय.

Self-styled godman Rajendra Gadge walks out on bail after 42 days as investigation delays raise questions.
Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे अन् ठाकरेंना मोठा धक्का, ३ बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे दत्तधाम सरकार नावाने भोंदू राजेंद्र गडगे याने सुरू केलेल्यां आश्रमावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली होती. कॅन्सरसह अनेक दुर्धर आजार मंत्र तंत्राने बरे करण्याचा दावा करणारे अनेक व्हिडिओ देखील सोशल माध्यमात व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र 42 दिवसानंतर भोंदू गडगेला जामीन मंजूर झाला असून अर्धवट व्हिडिओ दाखवण्यात आल्याचा आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन मंजूर करण्यात आलाय.

Self-styled godman Rajendra Gadge walks out on bail after 42 days as investigation delays raise questions.
Sangli Tragedy : वडिलांना बुडताना बघितलं, थेट नदीत उडी घेतली; २० वर्षांच्या मुलीचा बुडून मृत्यू

दरम्यान भोंदू गडगेला जामीन मंजूर झाल्यानंतर फिर्यादी तथा अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी नाराजी व्यक्त केलीय. गेल्या 42 दिवसात पोलिसांनी तपासाबाबत दुर्लक्ष केले असून अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल देखील अद्याप आलेला नाही. यातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा देखील शोध घेता आला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

Self-styled godman Rajendra Gadge walks out on bail after 42 days as investigation delays raise questions.
एकीकडे 47°C उष्णतेचा तडाखा, दुसरीकडे मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकं|VIDEO

नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात याचे प्रकरण समोर आल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक भोंदूवर कारवाई करण्यात आली खरी, मात्र पोलिस तपासात सातत्य नसल्याने त्याचा फायदा आरोपींना होतोय हे मात्र नक्की अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com