महावितरणच्या गुंड कर्मचाऱ्याची ग्राहकाला मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, VIDEO

Badlapur Mahavitaran Employee Beat Consumer: बदलापुरात महावितरणच्या गुंड कर्मचाऱ्याची ग्राहकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्याने वाढीव वीज बिलाबाबत तक्रार घेऊन आलेल्या ग्राहकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सदर ग्राहक आपल्याला आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत विचारणा करण्यासाठी कार्यालयात आला होता. मात्र बिलिंग विभागातील गुंड कर्मचारी माळी ग्राहकाच्या अंगावर धावून गेले इतकच नाही तर त्यांना तक्रारदार ग्राहकाला मारहाणही केली. हा सर्व प्रकार कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना वाढीव वीज बिल येत असल्याने प्रचंड नाराजी आहे. आपल्या वाढीव वीज बिलाबाबत विचारण्यासाठी अनेक ग्राहक महावितरण कार्यालयात येत असतात. मात्र त्यांच्याशी उद्धट वर्तन करत त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या मुजोर कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्राहकांमधून केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com