Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे अन् ठाकरेंना मोठा धक्का, ३ बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Shiv Sena workers joined BJP in Devgad: कोकणात शिवसेना शिंदेगट आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. यामुळे कोकणात भाजपची ताकद वाढली.
Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे अन् ठाकरेंना मोठा धक्का, ३ बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'
CM Devendra FadnavisSaam Tv
Published On
  • कोकणात भाजपची ताकद वाढली

  • भाजपने शिंदेसेना आणि ठाकरेसेनेला दिला धक्का

  • ३ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

  • सिंधुदुर्गमध्ये शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये आले

विनायक वंजारी, सिंधुदुर्ग

कोकणामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. भाजपने देवगडमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला. पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कोकणात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेलाहा जोरदार धक्का दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवगड विजयदुर्ग येथील ठाकरेंच्या शिवसेनेचे ३ प्रमुख शिलेदार नितेश राणेंच्या गळाला लागले आहेत. कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघात पंचायत समितीचे एकमेव सदस्य म्हणून निवडून आलेल्या विष्णू घाडी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडली. त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत देवगड तालुका प्रमुख जयेश नर, विभाग प्रमुख संदीप डोलकर आणि शिंदे गटाचे मनचे गावचे सरपंच दिपक तोरसकर यांनी देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद वाढली.

Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे अन् ठाकरेंना मोठा धक्का, ३ बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra politics : शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर, दिग्गज नेत्याला दिली आमदारकीची ऑफर, विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट

शिंदेच्या शिवसेनेचे मणचे गावचे सरपंच दीपक तोरस्कर, गिर्ये ग्रामपंचायत सदस्य विनोद गावकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. कार्यक्रमाला भाजपचे मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. नारकर, पंचायत समिती सदस्य सौ. चव्हाण, माजी सभापती रवी पाळेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे अन् ठाकरेंना मोठा धक्का, ३ बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: भाजपचे 100 नगरसवेक काँग्रेसच्या संपर्कात, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, राजकारणात भूकंप?

यावेळी माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, 'गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप हाच एकमेव पर्याय असल्याचा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केलाय. कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास ही भाजपची सर्वात मोठी ताकद आहे. भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना राणे यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी भाजप घेईल अशी ग्वाही त्यांना दिली.

Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे अन् ठाकरेंना मोठा धक्का, ३ बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: ठाकरेंच्या युवा नेत्याचं अपघाती निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काळात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रकल्प येणार आहेत. त्यातून हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. रोजगारासाठी बाहेर गेलेल्या युवकांना भविष्यात आपल्या जिल्ह्यातच काम मिळेल. राज्य आणि केंद्र सरकार सिंधुदुर्गच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे नितेश राणे यांनी आश्वासन दिले. तसंच, कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांबाबत बोलताना त्यांनी सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक असतील, असे आश्वासन दिले.

Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे अन् ठाकरेंना मोठा धक्का, ३ बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसचे २३ नगरसेवक नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com