

विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे २३ नगरसेवक नॉट रिचेबल.
विजय वडेट्टीवार यांनी घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला.
नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवल्याचा दावा.
विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा घडामोडी घडत आहेत. जागा वाटपावरून महायुती आणि मविआमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे, त्याचदरम्यान पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची बातमी हाती आली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेवट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून घोडेबाजारावरून राजकारणात नीतीमत्ता राहिली नसल्याचं म्हटलंय.
चंद्रपुरात घोडे बाजार जोरात चालू असल्याचं त्यांनी म्हटलंय. आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रीचेबल आहेत. त्यांना पाच -पाच लाख रुपये देऊन त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचं विजय वडेवट्टीवार म्हणालेत.पैशाने आमचे सगळे लोक विकली गेली आहेत. आता आम्ही व्हीप जारी करून त्यांच्या घरांना चिपकवणार आहे.
त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही वडेवट्टीवार म्हणालेत. विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी होत आहेत. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतील तर काँग्रेसची नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहेत. तेथील जवळपास ७० नगरसेवक नॉटरिचेबल असल्याची चर्चा होते.
मात्र काँग्रेसने हा दावा खोडून काढला होता. आता मात्र काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी नगरसेवक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका मतासाठी १० लाखांपर्यंत व्यवहार झाल्याची चर्चा आहे. नगरसेवक विकल्या गेल्यानं विजय वडेट्टीवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
भाजपवर टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूरमध्ये घोडेबाजार जोरात चालू आहे. पण या घोडा बाजाराची गरजही नव्हती. आता आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गर्मी आणि मस्ती येतेच, ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे. बिना श्रमाने लोकप्रतिनिधी म्हणून आता आमदाराचे ठेकेदार व्हायला लागल्याने राजकारणात नीतीमत्ता राहिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.