Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीसोबत काँग्रेस करणार युती? बड्या नेत्याच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात खळबळ

Cockroach Janata Party : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उदयास आलेली 'कॉकरोज जनता पार्टी' (CJP) सतत चर्चेत आहे. त्याच्या अनोख्या उगमामुळे आणि झपाट्याने वाढणाऱ्या फॉलोअर्सच्या संख्येमुळे ही चळवळ राजकीय चर्चेचा विषय बनली आहे.
Cockroach Janata Party :
CONGRESS-CJP ALLIANCE BUZZ: COCKROACH JANATA PARTY CREATES POLITICAL STIRsaam tv
Published On
Summary
  • कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत.

  • काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे युतीच्या चर्चा सुरू.

  • तरुणांमध्ये सीजेपीची लोकप्रियता वाढत आहे.

सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झालेली कॉकरोच जनता पार्टीला अनेक राजकीय पक्ष पाठिंबा देत आहे. सीजेपीला अनेक नेते एक डिजिटल आंदोलन म्हणत आहेत. सीजेपीला सरकारविरोधातील असंतोष आणि तरुणांची नाराजीचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं आहे.

दरम्यान या 'कॉकरोच जनता पार्टीच्या अनोख्या उममामुळे ही चळवळ राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. या ऑनलाइन पार्टीबाबत एका काँग्रेस नेत्यानं महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. कॉकरोज पार्टीनं काँग्रेससोबत यावं, असं भाष्य त्यांनी केलंय. त्यामुळे पुढील काळात काँग्रेस नव्या राजकीय पक्षासोबत युती करेल का यावरून चर्चांना उधाण आले आहे.

Cockroach Janata Party :
Cockroach Janata Patry: सोशल मीडिया अकाउंट बंद होताच कॉक्रोच जनता पार्टीनं उचललं मोठं पाऊल

राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारावं

काँग्रेस नेते उदित राज यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटलं की,कॉकरोच जनता पार्टीसारख्या डिजिटल चळवळीला जर खऱ्या राजकीय शक्तीमध्ये रूपांतरित व्हायचे असेल, तर त्यासाठी प्रस्थापित नेतृत्वाची गरज लागेल. त्यामुळे राहुल गांधींचे नेतृत्व या असंतोषाला आणि ऊर्जेला संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी एका मोठ्या चळवळीत रूपांतरित करू शकते. जर ही ऊर्जा विखुरली गेली, तर तिचा प्रभाव कमी होऊ शकतो, असं उदित राज म्हणालेत.

Cockroach Janata Party :
मंत्रिमंडळात फेरफार की नेतृत्वबदल? मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री दोघांना दिल्लीचा निरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

तृणमूल काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला

दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेही या ऑनलाइन पार्टीला पाठिंबा दर्शवला आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार, डेरेक ओ'ब्रायन यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सूचित केले की, त्यांचा पक्ष अशा डिजिटल आवाजांना गांभीर्याने घेतो आणि लोकशाही मुद्द्यांवर सक्रिय सहभागाला पाठिंबा देतो. राजकीय वर्तुळात या पाठिंब्यावर विविध अर्थ लावले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com