Maharashtra Politics: ठाकरेंच्या युवा नेत्याचं अपघाती निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Shwetank Tambe Dies: मुंबईमध्ये ठाकरेसेनेच्या युवा नेत्याचे अपघाती निधन झाले. वांद्रे पूर्व विधानसभा समन्वयक श्वेतांक तांबे यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Maharashtra Politics: ठाकरेंच्या युवा नेत्याचं अपघाती निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
shwetank tambe diesSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबईमध्ये ठाकरेसेनेच्या युवा नेत्याचे निधन

  • वांद्रे पूर्वचे युवा नेते श्वेतांक तांबे यांचे अपघाती निधन

  • नुकताच ३० वा वाढदिवस साजरा केला होता

  • आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा नेत्याने निधन झालं. वांद्रे पूर्व विधानसभा समन्वयक श्वेतांक तांबे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागच्या आठवड्यामध्ये श्वेतांक यांनी आपला ३० वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर त्यांचे अपघातामध्ये निधन झाल्यामुळे दु:ख व्यक्त केले जात आहे.

श्वेतांक तांबे यांच्या निधनाने तरुण तडफदार कार्यकर्ता, निष्ठावंत आणि सच्चा शिवसैनिक हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. हसतमुख स्वभाव आणि सर्वांसोबत आपुलकीने वागणाऱ्या श्वेतांक यांच्या आठवणींनी अनेकांना रडू आवरेना झाले. सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत श्वेतांकसोबतच्या आठवणी त्यांचे मित्र परिवार शेअर करत आहेत. श्वेतांक यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांच्या पाश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

श्वेतांक यांच्या निधनानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'युवासेना वांद्रे (पूर्व) विधानसभा समन्वयक, निष्ठावंत शिवसैनिक श्वेतांक तांबे ह्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि तांबे कुटुंबियांना ह्या दुःखातून सावरण्याचे बळ देवो. भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती.' अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. हसरा चेहरा नेहमी मस्ती करणारा आज आम्हाला पूर्ण शांत करून गेला, भावा खूप लवकर निघून गेलास अशा भावान अनेकांनी व्यक्त केल्या.

Maharashtra Politics: ठाकरेंच्या युवा नेत्याचं अपघाती निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
Maharashtra Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक

तर जय सरपोतदार यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, 'वाटलं नव्हतं कधी श्रद्धांजली अर्पण करावी लागेल. एक निष्ठावंत शिवसैनिक आणि प्रामाणिक मित्र गेला.' फक्त ठाकरेसेनेतीलच नाही तर शिंदेची शिवसेना आणि भाजपमधील अनेक नेते आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर पोस्ट करत श्वेतांकला श्रद्धांजली वाहत आहेत. श्वेतांक यांचा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आली नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या आईसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आईसोबत ते मुव्ही डेटला गेले होते.

Maharashtra Politics: ठाकरेंच्या युवा नेत्याचं अपघाती निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं पक्षात सर्जिकल स्ट्राइक; ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान बड्या नेत्याला पदावरून हटवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com