Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; कारचा अक्षरश: चक्काचूर, एकाच कुटुंबातील तिघे ठार

Chhatrapati Sambhajinagar Road Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; कारचा अक्षरश: चक्काचूर, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Accident Saam tv

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या धूळे-सोलापूर महामार्ग रस्त्यावर माळीवाडा-फातियाबाद परिसरात ही अपघाताची भीषण घटना घडली आहे. भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे-सोलापूर हायवे रस्त्यावरील माळीवाडा-फातियाबाद येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; कारचा अक्षरश: चक्काचूर, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Mumbai Accident VIDEO: मुंबईत हिट अँड रनचा थरार, भरधाव पिकअपने दोन विद्यार्थ्यांना उडवलं; एकाच जागीच मृत्यू

भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या अपघातात मृत झालेले तिघेही लोक बजाजनगर भागात राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; कारचा अक्षरश: चक्काचूर, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Pimpri Chinchwad Accident: चालकाचं नियंत्रण सुटलं अन् स्कूल बस थेट पुलाच्या कठड्याला धडकली; नागरिकांनी ७० विद्यार्थ्यांना 'असं' वाचवलं, थरारक VIDEO

कन्नडवरून छत्रपती संभाजीनगरकडे येताना अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अलकाबाई राजू उचित, राजू आत्माराम उचित आणि अर्जुन राजू उचित या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचा मृत्यू झाल्याने उचित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिघांच्या मृत्यूने बजाजनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com