Mumbai Accident VIDEO: मुंबईत हिट अँड रनचा थरार, भरधाव पिकअपने दोन विद्यार्थ्यांना उडवलं; एकाच जागीच मृत्यू

Mumbai Andheri Accident Video : मुंबईतील अंधेरी परिसरात भरधाव पिकअपने सायकलवरून जाणाऱ्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
Mumbai Andheri Accident Video
Mumbai Andheri Accident VideoSaam TV

संजय गडदे साम टीव्ही मुंबई

पुणे पोर्श कार अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत देखील हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या पिकअपने सायकलवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना अंधेरी पूर्वेकडील उड्डाण पुलावर घडली.

याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालक धनंजय राय याला अटक केली आहे. विवेक यादव (वय १८) असं अपघातात (Mumbai Accident News) मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर अमन यादव (वय १९) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ जूनच्या पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास विवेक यादव (कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थी) आणि अमन यादव (बी.एम.एस द्वितीय वर्ष) हे दोन विद्यार्थी अंधेरी (Andheri Accident) उड्डाणपुलावरून सायकलवरून जात होते. गुंदवली मेट्रोस्थानक जवळील उड्डाणपुलावर सुसाट वेगात आलेल्या पिकअपने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली.

Mumbai Andheri Accident Video
Wardha News : एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार; माथेफिरूच्या कृत्याने देवळी तालुक्यात खळबळ

ही धडक इतकी भीषण होती, की यात विवेक उड्डाणपुलावरून खाली कोसळला. या घटनेनंतर टेम्पो पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही तरुणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र विवेक यादव याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी पिकअप चालक धनंजय राय याला परेल येथून अटक केली. त्याच्यावर भरधाव गाडी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुजेटच्या माध्यमातून अपघाताचा तपास करीत आहेत.

Mumbai Andheri Accident Video
Pimpri Chinchwad Accident: चालकाचं नियंत्रण सुटलं अन् स्कूल बस थेट पुलाच्या कठड्याला धडकली; नागरिकांनी ७० विद्यार्थ्यांना 'असं' वाचवलं, थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com