Wardha News : एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार; माथेफिरूच्या कृत्याने देवळी तालुक्यात खळबळ

Wardha bhidi Crime News : एकतर्फी प्रेमातून भिडी येथे एका माथेफिरूने २३ वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार केले. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली.
Wardha bhidi Crime News
Wardha bhidi Crime NewsSaam TV

चेतन व्यास, साम टीव्ही वर्धा

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून भिडी येथे एका माथेफिरूने २३ वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार केले. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत माथेफिरूला अटक केली आहे.

Wardha bhidi Crime News
Robot End Life: धक्कादायक! कामाच्या ताणामुळे रोबोटने संपवलं जीवन, जगातील पहिलीच घटना

संदीप मसराम, असं अटक करण्यात आलेल्या माथेफिरू तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा जखमी तरुणीच्या गावातीलच आहे. गुरुवारी 23 वर्षीय तरुणी ही आपल्या घरी एकटी होती. दरम्यान ती आपल्या अंगणात भांडे घासत होती. त्याचवेळी आरोपी संदीप हा तिथे आला आणि त्याने तरुणीच्या गळ्यावर कैचीने वार (Crime News) केले.

आरडाओरड झाली असता आरोपी संदीपने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी तरुणी ही रक्तबंबाळ स्थितीत परिसरातील पुरषोत्तम रेगे यांना दिसताच त्यांनी कुंपणाचे दार ओलांडून घरात प्रवेश केला. प्रसंगवधान राखल्याने तरुणीचा जीव वाचला.

घटनेनंतर माथेफिरू संदीप मसराम हा तरुणीच्या घरात लपून बसला होता. गावकऱ्यांनी त्याला ताब्यात घेत चांगलाच चोप दिला आणि देवळी पोलिसांच्या (Bhandara Police) स्वाधीन केले. जखमी तरुणीला लागलीच भिडी येथील रुग्णालयात पुरषोत्तम रेंगे व त्यांची मुलगी पूजा हिने रुग्णालयात दुचाकीवर बसवून उपचारासाठी दाखल केले.

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. तरुणीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सार्थक नेहते यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

Wardha bhidi Crime News
Ajanta Caves News : सावधान! अजिंठा लेणीतील धबधब्यावर रील्स काढाल तर थेट जेलमध्ये जाल; पोलिसांचा कडक इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com