Ajanta Caves News : सावधान! अजिंठा लेणीतील धबधब्यावर रील्स काढाल तर थेट जेलमध्ये जाल; पोलिसांचा कडक इशारा

Ajanta Caves Waterfall : अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरात मोबाइलवर रील्स काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Ajanta Caves News
Ajanta Caves NewsSaam TV
Published On

तुम्ही जर पावसाळ्यात अजिंठा लेणी परिसरात फिरायला जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरात मोबाइलवर रील्स काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. धबधब्यावर किंवा धबधब्याच्या परिसरात फोटो आणि रील्स काढण्यासाठी जाल तर कारवाई करू, असा थेट इशारा पोलिसांन दिला आहे.

Ajanta Caves News
Water Training Video : वाहत्या पाण्यात समुहाने अडकलात तर कसा वाचवाल जीव? हवामान तज्ज्ञांनी शेअर केला VIDEO

सुरक्षेच्या कारणास्तव अजिंठा लेणी (Ajanta Caves Waterfall) परिसरातील सप्तकुंड धबधब्यावर रील्स, सेल्फी, फोटोसेशन करण्यास पोलिसांनी घातली बंदी घातली आहे. धबधबा हा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्यानं जिवाची बाजी लावून कोणीही रील्स, सेल्फी अथवा फोटोसेशन करू नये, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

कोणताही पर्यटक असे कृत्य करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा पोलिसांनी इशारा दिला आहे. अजिंठा लेणी हा परिसर पावसाळ्यात धबधब्यांसाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी संख्येत मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

मागील आठवडाभरापासून छत्रपती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अजिंठा डोंगररांगामधून (Ajanta Caves News) वाहणाऱ्या छोट्या-मोठ्या नद्या-नाले प्रवाहीत झाले आहेत. अजिंठा लेणी परिसरातील डोंगर दऱ्यांनी जणू हिरवा शालूच नेसला आहे. त्यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

त्यातच राज्यातील अनेक पर्यटनस्थळी असलेल्या धबधब्यांवर फोटो किंवा रील्स काढताना पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हीच बाब लक्षात घेता फर्दापूर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजिंठा लेणी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील या धबधब्यात नैसर्गिक पद्धतीने सात कुंडांसारखी रचना तयार झाल्याने याला सप्तकुंड धबधबा असे नाव पडले आहे. अजिंठ्याच्या डोंगर रांगातील हा धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरलाय. पाऊस पडू लागला की पर्यटन राजधानी असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाला वेगळाच साज चढतो.

Ajanta Caves News
Pune News: पुणेकरांसाठी खुशखबर! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा दीडपटीने वाढला; वाचा ताजी आकडेवारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com