Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य

Buldhana Crime: बुलडाणामध्ये एका विहिरीत एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. बापाने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून देत त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:ही विहिरीत उडी घेत आयुष्य संपवलं.
Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य
Buldhana CrimeSaam Tv
Published On
  • बुलडाण्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह विहिरीत आढळले

  • वडिलांनी ४ मुलांना विहिरीत ढकलून नंतर आत्महत्या केली

  • कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून घडली घटना

  • जळगाव जामोद पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये कौटुंबिक वादातून बापाचे टोकाचे पाऊल उचललं. बापाने चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे राजुरा धरण परिसर हादरला. विहिरीमध्ये एकाच कुटुंपातील ५ जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या पाचही जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जळगाव जामोद पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका शेतातील विहिरीत एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या चार लहान मुलांना विहिरीत ढकलून नंतर स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य
Nanded Shocking : डॉक्टर होऊन आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, त्याआधीच काळानं झडप घातली; १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनं हळहळ

मृत व्यक्तीचे नाव विजय मुसा किराडिया असे असून तो जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावात राहणारा होता. या व्यक्तीला ४ मुलं होती. प्रित किराडिया (वय ७ वर्षे)), प्राची किराडिया (वय ५ वर्षे), पूर्वी किराडिया (वय ४ वर्षे) आणि पियुष किराडिया (वय २ वर्षे) अशी त्याच्या ४ मुलांची नावं होती. विजय किराडिया आपल्या चार मुलांना सोबत घेऊन विहिरीवर गेला. आधी त्यावे चारही मुलांना विहिरीत ढकलून देत त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यानेही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य
Nanded Shocking : डॉक्टर होऊन आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, त्याआधीच काळानं झडप घातली; १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनं हळहळ

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय किराडिया याची पत्नी घरगुती वादातून माहेरी निघून गेली होती. रविवारी सकाळी विजय घरातील काम करत असताना त्याच्या वडिलांनी “तू स्वतः काम का करतो, तुझी बायको कुठे गेली?” असा प्रश्न विचारला. त्यानंतर मानसिक तणाव आणि कौटुंबिक वादातून विजयने आपल्या चारही चिमुकल्यांना राजुरा धरण परिसरातील विहिरीत ढकलून स्वतःही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य
Nashik: घरामध्ये लाईट बसवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून नवविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या दुर्दैवी घटनेमुळे भाले अंजन गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलिस करत आहेत.

Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य
Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com