

नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
लाईट बसवताना भयंकर घडलं
वसईमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
बॅनर हटवताना तरुणाचा मृत्यू झाला
विजेचा धक्का लागून नवविवाहित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नाशिकच्या येवले तालुक्यातील पाटोदा येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुभम शिवाजी बोरनारे असे मृत्यू झालेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. दीड महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते. आज सकाळी नवीनच बांधण्यात आलेल्या संडासमध्ये लाईट बसवण्यासाठी तो गेला होता.
लाईट बसवताना अचानक विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरनारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अशीच घटना वसईमध्ये देखील घडली. वसई तालुक्यातील नायगाव पूर्व येथील गिरीनार हॉटेलसमोर अतिक्रमण हटवताना विजेचा धक्का लागून २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अभय राकेश तिवारी असे मृत तरुणाचे नाव असून तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभयच्या मृत्यूमुळे त्यांच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला.
वसई-विरार महानगरपालिकेचे अधिकारी अतिक्रमण हटवण्यासाठी आले होते. त्यावेळी गिरीनार हॉटेलसमोर लोखंडी बॅनरवर कारवाई करतील म्हणून ते हटवण्यासाठी अभय तिवारीसह इतर ३ जणांनी बॅनर उचलताच वरून गेलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने चौघांनाही जोरदार विजेचा धक्का बसला. जखमींना तातडीने मिरारोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी अभय तिवारीला मृत घोषित केले. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.