Shocking : पुण्यात वडिलांचा मुलावर ॲसिड हल्ला, धक्कादायक कारण समोर

Pune Kothrud Acid Attack News : पुण्यातील कोथरूड परिसरात कौटुंबिक वादातून वडिलांनी मुलावर फिनेल फेकल्याची धक्कादायक घटना. तरुण गंभीर जखमी असून आरोपी वडील फरार, पोलिसांकडून तपास सुरू.
PUNE SHOCKER FATHER ATTACKS SON WITH CHEMICAL IN KOTHRUD
PUNE SHOCKER FATHER ATTACKS SON WITH CHEMICAL IN KOTHRUDSaam Tv
Published On
Summary
  • कोथरूडमध्ये वडिलांकडून मुलावर फिनेल हल्ला

  • तुषार कदम गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

  • पैशांच्या वादातून घटना घडल्याची माहिती

  • आरोपी वडील फरार, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

सचिन जाधव, पुणे

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कोथरूड परिसरात कौटुंबिक वादातून वडिलांनीच आपल्या मुलावर ॲसिड हल्ला केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जखमी मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ते अद्याप फरार असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार शाम कदम (वय ३०) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. १४ मे रोजी ही घटना घडली. तुषार घरात झोपलेला असताना पैशांच्या कारणावरून त्याचा वडिलांसोबत वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, संतापाच्या भरात वडिलांनी घरात स्वच्छतेसाठी वापरलं जाणारं फिनेल मुलाच्या चेहऱ्यावर फेकलं.

PUNE SHOCKER FATHER ATTACKS SON WITH CHEMICAL IN KOTHRUD
Shocking : शिक्षकाने विद्यार्थिनीला झाडू मारण्याच्या बहाण्याने बोलावलं; अश्लील व्हिडिओ दाखवून केला लैंगिक अत्याचार, जळगावात खळबळ

या हल्ल्यात तुषारच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक तपास करून आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके काम करत आहेत.

PUNE SHOCKER FATHER ATTACKS SON WITH CHEMICAL IN KOTHRUD
Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा कौटुंबिक वादाचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. किरकोळ कारणावरून होणारे वाद अनेकदा हिंसाचारात बदलत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत भीती आणि संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com