Shocking : शिक्षकाने विद्यार्थिनीला झाडू मारण्याच्या बहाण्याने बोलावलं; अश्लील व्हिडिओ दाखवून केला लैंगिक अत्याचार, जळगावात खळबळ

Jalgaon Crime News : जळगावच्या धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या विद्यार्थिनीचे शिक्षकाकडून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
JALGAON SHOCKER: TEACHER BOOKED FOR SEXUAL ABUSE OF MINOR GIRL IN DHARANGAON
JALGAON SHOCKER: TEACHER BOOKED FOR SEXUAL ABUSE OF MINOR GIRL IN DHARANGAONSaam Tv
Published On
Summary
  • धरणगावात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

  • आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

  • शाळा सुरू होण्यापूर्वी बोलावून अत्याचार केल्याचा आरोप

  • पोलिसांकडून तपास सुरू, कठोर कारवाईची शक्यता

संजय महाजन, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकानेच इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते आणि स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक मराठे हा विद्यार्थिनीला शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी सुमारे दहा वाजता झाडू मारण्याच्या कारणावरून शाळेत बोलावून घेत असे.

JALGAON SHOCKER: TEACHER BOOKED FOR SEXUAL ABUSE OF MINOR GIRL IN DHARANGAON
Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

शाळेत कोणीही नसल्याचा फायदा घेत तो तिच्यासोबत गैरवर्तन करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी मुलीला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे शोषण करत असल्याची माहितीही पुढे आली आहे. ३० एप्रिल २०२६ रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशी देखील आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

JALGAON SHOCKER: TEACHER BOOKED FOR SEXUAL ABUSE OF MINOR GIRL IN DHARANGAON
Cancer : फक्त दारू, सिगारेट नव्हे तर 'या' नेहमीच्या वापरातील गोष्टींमुळेही होतो कॅन्सर

विद्यार्थिनीने घडलेली बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com