Nanded Shocking : डॉक्टर होऊन आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, त्याआधीच काळानं झडप घातली; १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनं हळहळ

19 year old student dies before fulfilling parents dream nanded kinwat : डॉक्टर होऊन आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली.
आई-वडिलांचं स्वप्न बेचिराख! डॉक्टर होण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनं हळहळ
Jayesh Mirashesaam tv
Published On

संजय सूर्यवंशी, नांदेड | साम टीव्ही

डॉक्टर व्हायचं होतं. आई-वडिलांचं हे स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होता. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला. नीट परीक्षाही दिली होती. ती उत्तीर्णही झाला होता. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. शनिवारी दुपारी घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई-वडिलांचं स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या मुलाला काळानं हिरावलं. १९ वर्षीय होतकरू विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गोकुंदा परिसरातील विद्यानगरात शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. १९ वर्षीय जयेश पांडुरंग मिराशे याचा मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. मिराशे कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कुलरमध्ये अचानक शॉकसर्किट झाला. जयेशला विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्याचा मृत्यू झाला.

जयेशला व्हायचं होतं डॉक्टर

जयेश मिराशे हा १९ वर्षीय तरूण आई-वडिलांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होता. तो डॉक्टर होण्यासाठी अहोरात्र मेहनत करत होता. पण नियतीला हे काही मान्य नव्हतं. शनिवारी घरात विपरित घटना घडली. घरात कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. जयेश त्या कुलरजवळ गेला असता त्याला विजेचा जोरदार झटका लागला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं विद्यानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

...तोपर्यंत उशिर झाला होता

जयेश यानं नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. चांगल्या गुणांनी तो उत्तीर्ण झाला होता. जयेश हा होतकरू विद्यार्थी होता. नुकतीच नीट परीक्षाही झाली होती. त्यात त्याला चांगले गुणही मिळाले होते. आपल्या गुणवत्तेची चुणूक त्याने दाखवली होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. आई-वडिलांनी बघितलेल्या स्वप्नांच्या दिशेने त्यानं झेप घेतली होती. स्वप्न पूर्ण होणार होते असे वाटत असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली. घरातील कुलरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाला. जयेश कुलरजवळ गेल्यानंतर त्याला विजेचा धक्का बसला. यात तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

आई-वडिलांचं स्वप्न बेचिराख! डॉक्टर होण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनं हळहळ
Crime: महाराष्ट्र हादरला! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com