Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

Shocking: कानपूरमध्ये कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका आयटीबीपी जवानाच्या आईचा हात निकामी झाला. न्यायाच्या शोधात हा जवान गेल्या तीन दिवसांपासून आपल्या आईचा तुटलेला हात घेऊन भटकत आहे.
ITBP JAWAN SEEKS JUSTICE AFTER ALLEGED MEDICAL NEGLIGENCE DAMAGES MOTHER’S HAND
ITBP JAWAN SEEKS JUSTICE AFTER ALLEGED MEDICAL NEGLIGENCE DAMAGES MOTHER’S HAND
Published On
Summary
  • कानपूरमध्ये आयटीबीपी जवानाच्या आईवर उपचारात निष्काळजीपणाचा आरोप.

  • आईचा हात निकामी झाल्यानंतर जवान न्यायासाठी भटकत आहे.

  • वैद्यकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित.

भारताची जमिनीवरील सीमा सुमारे १५,२०० किलोमीटर आहे. अनेक सैनिक निधड्या छातीने सीमेवर तैनात आहेत. सीमेवर तैनात असणाऱ्या लष्कर दलापैकी एक म्हणजे ITBP तिबेटच्या सीमेवर 'इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस'. लद्दाखमधील काराकोरमपासून अरुणाचल प्रदेशातील दिफुला पर्यंतच्या भारत-चीन सीमेवर हे दल तैनात असते. या दलातील सैनिक आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी तत्पर असतात.

ITBP JAWAN SEEKS JUSTICE AFTER ALLEGED MEDICAL NEGLIGENCE DAMAGES MOTHER’S HAND
पुणे पोलिसांकडून घुसखोरांवर लगाम; ११ महिन्यात तब्बल १०३ बांगलादेशी ताब्यात

पण भारत मातेचं रक्षण करणाऱ्या जवानाच्या आईला उपचार मिळत नसल्याचं प्रकार उघडकीस आला आहे. हे धक्कादायक वास्तव उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आले आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करणारा एक आयटीबीपी जवान, गेल्या ३ दिवसांपासून आपल्या आईचा तुटलेला हात घेऊन भटकत आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जवानाच्या आईला आपला हात गमावला होता, असा आरोप त्या जवानाने केला आहे.

ITBP JAWAN SEEKS JUSTICE AFTER ALLEGED MEDICAL NEGLIGENCE DAMAGES MOTHER’S HAND
पोलीस दलात खळबळ! ड्युटीवर जाणाऱ्या ASI ची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; नेमका वाद काय?

संपूर्ण प्रकरण काय आहे?

लष्कर जवानाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आईला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि उपचारासाठी त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालयात दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आईच्या हाताला संसर्ग झाला. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यावर त्यांना पारस रुग्णालयात पाठवण्यात आले.

त्यांची तपासणी केल्यावर डॉक्टरांना समजले की संसर्ग तिच्या संपूर्ण हातात पसरला आहे. जवानाच्या आईचा जीव वाचवण्यासाठी त्यांचा हात कापावा लागेल. त्यानुसार, १७ तारखेला एका शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी जवानाच्या आईचा उजवा हात कापला,

रुग्णालयाच्या निष्काळजीपणाबद्दल तक्रार करण्यासाठी त्याने रेल बाजार पोलीस ठाण्यात वारंवार भेटी दिल्या, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप जवानाने केला आहे. दरम्यान नाइलाजाने न्याय मिळत नसल्यानं जवान मंगळवारी आपल्या आईचा तुटलेला हात घेऊन थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com