स्मशानभूमीत राहणाऱ्या महिलेची अंगावर डिझेल ओतून आत्महत्या

Woman Self Immolation Case In Buldhana Maharashtra: बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे ३४ वर्षीय महिलेने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Cremation ground in Sakharkherda where a 34-year-old woman allegedly died after setting herself on fire. Police investigation is underway.
Cremation ground in Sakharkherda where a 34-year-old woman allegedly died after setting herself on fire. Police investigation is underway.saam tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: साखरखेर्डा येथील स्मशानभूमीत वास्तव्यास असलेल्या ३४ वर्षीय महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत महिला गंभीररित्या भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शारदा प्रकाश धनसरवाड (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या धानकी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील रहिवासी होत्या. प्राप्त माहितीनुसार, प्रकाश धनसरवाड हे आपल्या कुटुंबासह स्मशानजोगी व्यवसायानिमित्त साखरखेर्डा परिसरात आले होते.

Cremation ground in Sakharkherda where a 34-year-old woman allegedly died after setting herself on fire. Police investigation is underway.
ग्रीन गडचिरोली मिशनला सूरजगड इस्पात आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टकडून पाच लाख रोपांचे योगदान

काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून त्यांना परिसरातील स्मशानभूमींची स्वच्छता व वृक्षसंवर्धनाचे काम देण्यात आले होते. या कामासाठी स्थानिक नागरिकांकडूनही मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. लोकवर्गणीतून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव व सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता संतोष मोरे यांच्या पुढाकाराने या कुटुंबासाठी स्मशानभूमीत छोटे घरदेखील उभारण्यात आले होते.

Cremation ground in Sakharkherda where a 34-year-old woman allegedly died after setting herself on fire. Police investigation is underway.
बड्या पोलीस अधिकाऱ्याचे निधन, महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा

शनिवारी दुपारी प्रकाश धनसरवाड हे चहा आणण्यासाठी बसस्थानक परिसरात गेले असताना शारदा धनसरवाड यांनी घरात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी त्यांची लहान मुले स्मशानभूमीतील झाडाखाली खेळत होती. काही वेळानंतर शारदा या संपूर्ण जळालेल्या अवस्थेत घरात आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

Cremation ground in Sakharkherda where a 34-year-old woman allegedly died after setting herself on fire. Police investigation is underway.
धोंड्याच्या महिन्यात दाजीची हत्या, 30 लाखांसाठी मेहुण्याने दिली 3 लाखांची सुपारी

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल नामदेव काळे यांनी प्रकाश धनसरवाड यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप मेंधने पुढील तपास करीत असून, घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com