Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Dhananjay Munde On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. मनोज जरांगे यांच्या या आरोपाला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Dhananjay Munde On Manoj JarangeSaamTV
Published On

Summary:

  • मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

  • हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा आरोप

  • धनंजय मुंडे यांचा हत्येच्या कटात हात

  • जरांगेंच्या आरोपाला धनंजय मुंडेंनी दिलं प्रत्युत्तर

मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. माझ्या हत्येचा कट रचण्यात धनंजय मुंडे यांचा हात होता त्यामुळे धनंजय मुंडे यांची चौकशी करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. माझ्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. जेवणात विष टाकून, मला औषध देऊन किंवा गाडीचा अपघात करून मला मारण्याचा कट रचण्यात आला होता असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली.

जरांगेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी -

धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या हत्येच्या कटाचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, 'राज्यातील जनतेसमोर एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी तो मेळावा घेतला. राज्यात जातीय वातावरण कोण तयार केले. बीड जिल्ह्यात ओबीसी मधल्या अनेकांची घर जाळी ही प्रवृत्ती कोणाची. मला तलवारीने मारायला येणाऱ्याची मी गळाघेट घेतली. जरांगे यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावं. तुमची तयारी कधी? EWS मध्ये जास्त आरक्षण. तुम्ही हाके यांना मारलं, तुम्ही वाघमारेंना मारलं ही प्रवृत्ती कुणाची. माझा त्यांचा बांधला बांध नाही. मी कट कशाला करू.'

जरांगे आणि माझी नार्को टेस्ट करा -

धनंजय मुंडे विश्रामगृहातील बैठकीबद्दल सांगितले की,'निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नाव घेतले. मी शासकीय विश्रामगृहात दर सोमवारी बसतो. अनेक जण भेटतात. आता अटक झालेले त्यापैकी काही भेटले असतील. यांच्यात असला कट, त्यांनीच पाठवले का? ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत. माझी प्रतिमा कशी तयार केली जात आहे. कारण मी सभेत दोन प्रश्न उपस्थित केले म्हणून. माझं म्हणणं आहे या प्रकरणात CBI ने चौकशी केली पाहिजे. माझी ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा. आरोपींची, जरंगेंची आणि माझीसुद्धा ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा.'

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Manoj Jarange Live : भाऊबि‍जेला कट रचला, मनोज जरांगेंनी वाल्मिक कराड, पंकजा मुंडेंचेही नाव घेतलं, नेमकं काय काय म्हणाले?

मला संपवण्याची धमकी -

धनंजय मुंडे यांनी माझी आणि जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, 'जरांगे शिवीगाळ करणार का? घरात इंग्रज आले होते का? असे प्रश्न बोलतात. आमची देखील मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ओबीसीमधून नाही. AI ने आज काही तयार करतात. मनोज जरांगे यांना या सगळ्या गोष्टी महागात पडतील. मी जीवनात पहिल्यांदा ओबीसी मेळाव्यात गेलो. अनेकदा मला बाकीच्यांनी हकलून काढलं. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ५०० मराठा बांधवांचे जीव गेले. मला संपून टाकण्याची ऑन एयर धमकी दिली आहे. त्यांनी त्यांची माणसं पाठवायची. ओळख पटवून फोटो काढायचे. ब्रेन मॅपिंग, नार्को, सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची चौकशी CBI केली गेली पाहिजे.'

जरांगेंना शेतकरी नेता व्हायचंय -

तसंच, 'दादागिरी कोणाची आहे. समाजा समाजात अंतर कोणी पाडलं. अशा खोट्या केसेस करून ओबीसी समाजाचा आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप्प राहील का? तुमच्या मेव्हण्याच्या वाळूचे ट्रक किती पकडले. मी सरकारला विचारतो त्यात काय ॲक्शन झालं. कुणाला संपवायचं माझे संस्कार नाहीत. मनोज जरांगे मला संपवण्याचा प्रयत्न करू नका. आता ते आरक्षणावर बोलत नाही त्यांना शेतकरी नेता व्हायचं आहे.',असे धनंजय मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Manoj Jarange: हत्येचा कट कसा रचला गेला? मनोज जरांगेंनी घटनाक्रमच सांगितला; बड्या नेत्याचं नाव केलं उघड

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी आवाज उठवला -

धनंजय मुंडे यांनी सांगितले की, '३० वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आहे. जात-पात धर्म पाळायचा नाही ही शिकवण आण्णा आणि गोपीनाथ मुंडेंनी दिली. मी ज्या जातीत जन्माला आलोय त्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीमधील सहकारी मित्र आहेत. जिल्हा परिषदेचा सदस्य झालो. त्यावेळी पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, असा ठराव बीड जिल्हा परिषदेत घेतला. ती महाराष्ट्राची पहिली जिल्हा परिषद होती. त्यामुळे राज्यातील इतर ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी चळवळ सुरू झाली.'

परळीत मराठ्यांची आंदोलने झाली त्यात मी सहभागी होतो. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीनंतर जरांगेंचे आंदोलन झाले. त्या आंदोलानाला जागा देण्यापासून पाणी देण्यापर्यंत वाहने देण्यापर्यंत मदत केली.मेटे, संभाजीमहाराज यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मराठा समाजाच्या लढ्यासाठी उतरले. मराठ्यांच्या मुंबईतील मोर्चात सहभागी होता आले. त्यामध्ये बोलण्याची संधीही मला देण्यात आली. ५ वर्षे राज्यात विरोधीपक्ष नेता म्हणून काम केले. त्या काळात मराठा आंदोलने झाली तेव्हा सभागृह बंद केले. मराठा समाजाला आरक्षणासाठी आवाज उठवला. त्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत.

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Manoj Jarange : हत्येची सुपारी देणारा नेता कोण? जरांगे पाटील करणार मोठा गौप्यस्फोट

जरांगेंना उपोषण सोडायला मी लावलं -

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नगर जिल्ह्यात कोपर्डीला बलात्कार प्रकरण झाला. त्यावेळी तिथे कुणीही गेले नव्हते. मी तिथे पहिल्यांदा गेलो. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत अधिवेशन सुरू करू दिले नाही. ही मराठा समाजाप्रति आमची निष्टा आहे. मी पालकमंत्री होतो कुणबीचा निर्णय सरकारने घेतला. त्यावेळी ८० हजार कुणबीची प्रमाणपत्र बीडमध्ये मिळाले आहेत. तुम्ही रेकॉर्ड तपासू शकता. मंत्री म्हणून जरांगेंना उपोषण सोडायला लावलं. माझ्या हातून त्यांनी उपोषणही सोडले. माझं त्यांचे वैर नाही. १७ तारखेंची सभा सोडता त्यांच्याविरोधात मी एकाही शब्दाने बोललो नाही, आरोप केले नाहीत. अशास्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला १८ पगड जातीला सोबत घेऊन जाताना हा व्यक्ती कसाच आवरत नाही. धनंजय मुंडे हा या पृथ्वीतळावरच नसावा, असे जरांगेंना वाटतेय. १७ तारखेच्या सभेला मी त्यांना फक्त दोन प्रश्न विचारले. त्याची उत्तरे मिळाली नाहीत.

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com